नागपूरची धावपळ थांबणार! आ. सुधीर मुनगंटीवारांच्या ‘मिशन CGHS’ला मोठे यश; केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डांचे SSC ला भरतीचे थेट आदेश!
Summary
चंद्रपूरच्या ३,००० पेक्षा जास्त लाभार्थ्यांना मोठा दिलासा; रिक्त पदांमुळे रखडलेली आरोग्यसेवा आता पुन्हा धावणार ‘रॉकेट स्पीड’ने! चंद्रपूर: चंद्रपूर येथील केंद्रीय शासकीय आरोग्य योजना (CGHS) वेलनेस सेंटरमध्ये औषधांसाठी आणि उपचारांसाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागणाऱ्या तसेच तब्बल १६५ किलोमीटर दूर नागपूरची […]
चंद्रपूरच्या ३,००० पेक्षा जास्त लाभार्थ्यांना मोठा दिलासा; रिक्त पदांमुळे रखडलेली आरोग्यसेवा आता पुन्हा धावणार ‘रॉकेट स्पीड’ने!
चंद्रपूर: चंद्रपूर येथील केंद्रीय शासकीय आरोग्य योजना (CGHS) वेलनेस सेंटरमध्ये औषधांसाठी आणि उपचारांसाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागणाऱ्या तसेच तब्बल १६५ किलोमीटर दूर नागपूरची चक्कर मारावी लागणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत खूशखबर समोर आली आहे! राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्ली दरबारी लावलेल्या तगाद्याला मोठे यश आले असून, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी चंद्रपूर CGHS केंद्रातील रिक्त पदांच्या भरतीसाठी कर्मचारी निवड आयोगाकडे (SSC) अधिकृत सूचना पाठवल्याचे पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
🚨 १६५ किमीचा प्रवास अन् तासनतास प्रतीक्षा; काय होती खरी समस्या?
चंद्रपूर येथील CGHS वेलनेस सेंटरवर सुमारे ३,०३० केंद्रीय कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची धुरा आहे. मात्र:
कर्मचाऱ्यांचा तुटवडा: डॉक्टर, औषधनिर्माता (Pharmacist) आणि बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने आजारी रुग्णांना व निवृत्त वृद्धांना २ ते ३ तास ताटकळत राहावे लागत होते.
औषधांचा दुष्काळ: चंद्रपुरात वेळेवर औषधे उपलब्ध न झाल्यामुळे या रुग्णांना थेट १६५ किमी दूर नागपूरला धाव घ्यावी लागत होती. यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि शारीरिक त्रास प्रचंड वाढला होता.
ही गंभीर परिस्थिती पाहताच आ. सुधीर मुनगंटीवार यांनी थेट केंद्र सरकारकडे या समस्येचा पाठपुरावा सुरू केला होता.
⚡ केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचे आश्वासन अन् ‘ॲक्शन प्लॅन’
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्राची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी त्यांना अधिकृत पत्र पाठवून खालील बाबी स्पष्ट केल्या आहेत:
१. तात्काळ भरतीची सूचना: रिक्त पदे भरण्यासाठी कर्मचारी निवड आयोगाकडे (SSC) मागणीपत्र पाठवण्यात आले आहे.
२. औषधांचा नियमित पुरवठा: चंद्रपूर केंद्राला आवश्यक असलेल्या औषधांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
३. अतिरिक्त मनुष्यबळ: केंद्राची क्षमता वाढवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून दिले जात आहेत.
🎯 ‘फॉलोअप’चा मास्टरस्ट्रोक; मुनगंटीवारांचे SSC अध्यक्षांना थेट पत्र!
केवळ केंद्रीय मंत्र्यांकडून आश्वासन मिळाले म्हणून आ. सुधीर मुनगंटीवार थांबले नाहीत! प्रश्न पूर्णपणे मार्गी लावण्यासाठी त्यांनी आता थेट कर्मचारी निवड आयोगाच्या (SSC) अध्यक्षांना स्वतंत्र पत्र लिहून आक्रमक पवित्रा घेतला आहे:
”चंद्रपूरसह इतर गरजू CGHS केंद्रांमधील भरती प्रक्रिया ‘सर्वोच्च प्राधान्य’ देऊन तातडीने पूर्ण करण्यात यावी, जेणेकरून निवृत्त कर्मचाऱ्यांना आणि रुग्णांना वेळेवर दर्जेदार आरोग्यसेवा मिळू शकेल!”
🌟 लोकप्रतिनिधींच्या धडपडीला यश!
एखादा प्रश्न केवळ उपस्थित न करता, तो प्रशासकीय स्तरावर शेवटपर्यंत तडीस कसा नेहायचा, हे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चंद्रपूरच्या हजारो लाभार्थ्यांच्या डोक्यावरील मनस्तापाचे ढग आता हटले असून CGHS केंद्राला लवकरच नवीन डॉक्टर आणि कर्मचारी मिळणार आहेत.
राजकुमार खोब्रागडे
ब्युरो रिपोर्ट, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
