महाराष्ट्र हेडलाइन

चंद्रपुरातील वेकोलीचे लालपेठ आणि घुगुस येतील राजीव रतन हॉस्पीटल कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित करावे, आ. सुधीर मुनगंटिवार

Summary

चन्द्रपुर:- चन्द्रपुर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढनारी संख्या तसेच वाढनारा मृत्युदर लक्षात घेता. वेस्टर्न कोलफ़िल्ड्स लिमि. चे चन्द्रपुर शहरातील लालपेठ परिसरातील हॉस्पीटल व घुगुस येतील राजीव रतन हॉस्पीटल जिल्हा प्रशासनाने कोविड़ रुग्णांसाठी अधिग्रहित करावे तसेच 100 बेडेड महिला रुग्णालय सुद्धा […]

चन्द्रपुर:- चन्द्रपुर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढनारी संख्या तसेच वाढनारा मृत्युदर लक्षात घेता. वेस्टर्न कोलफ़िल्ड्स लिमि. चे चन्द्रपुर शहरातील लालपेठ परिसरातील हॉस्पीटल व घुगुस येतील राजीव रतन हॉस्पीटल जिल्हा प्रशासनाने कोविड़ रुग्णांसाठी अधिग्रहित करावे तसेच 100 बेडेड महिला रुग्णालय सुद्धा तातडीने कोविड़ रुग्णांसाठी उपलब्ध करावे, अशी मागणी विधिमंडळ लोकसेवा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आणि वेकोलीचे सीएमडी मनोज कुमार यांच्याशी आ. मुनगंटीवार यांची चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मक कार्यवाहिचे आश्वासन दिले आहे.

चन्द्रपुर जिल्ह्यात कोविड़ रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, मृत्युदर सुद्धा जास्त आहे, कोरोना प्रतिबंधक उपचारासाठी आरोग्य यंत्रणा मात्र कमी पडत असून बेडची संख्या अपुरी पडत आहे. औषधांचा तूटवड़ा मोठ्या प्रमाणावर भासत आहे
रेमिडीसीवीर हे इंजेक्शन रुग्णांना मिळत नसल्यामुळे गंभीर परिस्थिति निर्माण झाली आहे. बेड उपलब्ध नसल्यामुळे परिस्थिति आटोक्याबाहेर जातांना दिसत आहे. खाजगी रुग्णांलयामद्धे सुद्धा बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी यांची रिक्त पदे ही चिंतेची बाब आहे. ऑक्सीजन बेड्स , वेंटिलेटर बेड्स सुद्धा उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितिवर तोड़गा काडण्याच्या दृस्टिने वेकोलीचे चन्द्रपुर शहरातील लालपेठ परिसरातील हॉस्पीटल व घुगुस येतील राजीव रतन हॉस्पीटल जिल्हा प्रशासनाने कोविड़ रुग्णांसाठी अधिग्रहित करत उपलब्ध केल्यास यासंदर्भात मोठी उपाययोजना ठरेल असे आ. मुनगंटीवार यांनी मठले आहे.
त्याचप्रमाणे शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येतील 100 बेडेड महिला रुग्णांलायचे नुकतेच उद्घाटन होउनही सदर रुग्णालय कोविड़ रुग्णांसाठी उपलब्ध झालेले नाही. वर्षभरापूर्वी कोरोना संक्रमण सुरु झाल्यापासून मी या विषयाचा पाठपुरावा करत आहे. ही बाब सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या आपन निदर्शनास आणून दिली आहे. सदर विषयाकडे होणारे दुर्लक्ष चिंताजनक आहे. हे महिला रुग्णालय सुद्धा तातडीने कोविड़ रुग्णांसाठी उपलब्ध करण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

अमोल बल्कि
चन्द्रपुर जिल्हा
न्यूज रिपोर्टर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *