BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

लॉयड मेटल्स कंपनीच्या विज निर्मितीचा पाणी पुरवठा बंद 🔴 बिगर सिंचनाचे कंपनीकडे सुमारे 148.75 लक्ष बिल थकीत 🔴सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंत्याची धडक कारवाई

Summary

चंद्रपूर : घुग्घूस येथील लॉयड मेटल्स अॅन्ड एनर्जी कंपनीच्या विद्यूत निर्मितीकरिता वापरात येणा-या पाण्याचे थकीत बिल न भरल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंत्यांनी पाणी पुरवठा बंद करून पाणी पुरवठा करणा-या कार्यालयाला सिल ठोकले आहे. ही कार्यवाही दुपारपासून लॉयड मेटल्स कंपनी […]

चंद्रपूर : घुग्घूस येथील लॉयड मेटल्स अॅन्ड एनर्जी कंपनीच्या विद्यूत निर्मितीकरिता वापरात येणा-या पाण्याचे थकीत बिल न भरल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंत्यांनी पाणी पुरवठा बंद करून पाणी पुरवठा करणा-या कार्यालयाला सिल ठोकले आहे. ही कार्यवाही दुपारपासून लॉयड मेटल्स कंपनी कार्यालयात करण्यात आली. या कारवाईमुळे औद्योगित क्षेत्रात खळबळ उडाली लॉयड मेटल्स कंपनी कोट्यवधींचे बिल थकले आहे.

घुग्घूस परिसरात औद्योगिक क्षेत्र असून येथे विविध कंपन्या उत्पादन करीत माला पुरवठा इतरत्र करतात. लॉयड मेटल्स ही कंपनी अनेक वर्षांपासून या ठिकाणी कच्चा लोहा बनविण्यासाठी कार्यरत आहे. याठिकाणी बनविलेला लोहा हा इतरत्र पाठविल्या जातो. शेंकडो कामगार याठिकाणी कार्यरत आहेत.

कंपनीत वेगवेगळ्या पाळीत काम चालते. कंपनीचे या ठिकाणी उर्जा निर्मिती केंद्र असून या ठिकाणी विज निर्मिती करून कंपनीकरिता त्याचा उपयोग केला जातो. विज निर्मिती करिता पाणी हा वर्घा नदी आणि अनेक वर्षापासून बंद असलेल्या डब्लू सिएल कंपनीच्या खदाणीतील खोल खड्यातून ही कंपनी घेत आहे. मात्र मागील दहा वर्षांपासून या कंपनीने औदयोगिक क्षेत्रासाठी वापरात येणारे सिंचनाचे बिल भरले नाही. त्यानंतरही पाणी राजरोसपणे पापरणे सुरूच आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागा चंद्रपूर चे उपविभागीय अभियंता यांनी वेळोवेळी पत्राद्वारे बिल भरणाकरण्याबाबत सुचना केल्या आहेत. त्यांनतरही कंपनीचे त्याकडे दर्लुक्ष करून बिल न भरता पाणी घेऊन विज निर्मिती सुरूच ठेवली आहे. अखेर आज गुरूवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यानी कंपनी विरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारला. आज दुपारपासून कंपनी व्यवस्थपनाला बिल भरण्यासाठी अवगत केले परंतु नेहमीप्रमाणे त्यांनी दुर्लक्ष केले. अखेर पाणी पुरवठा करणा-या नदीकाठावरील कंपनीच्या कार्यालयाला सिल ठोकून पाणी पुरवठा कायमचा बंद केला आहे.

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *