***राखेच्या टिपर वर पोलीसांची धाड***
परळी न्यूज वार्ता:-परळी शहरातुन अतिरिक्त राखेची वाहतूक होत असल्याने परळीशहर वासियांना दमाचा त्रास व ह्रुदय विकार चा त्रास होउ लागल्याने सोमवारी ग्रामीण पोलीसांनी पाच गाड्यांवर कारवाई केल्यानंतर शहर पोलीसांनी सुध्दा पाच गाड्यांवर कारवाई करत दंड आकारण्यात आला आहे.
“पोलीस योध्दा न्युज नेटवर्क”ला मिळालेल्या माहितीनुसार अतिरिक्त राख हवेत पसरुन लोकांना श्वसनाचे विविध प्रकारचे रोग उद्भवु लागले.
त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली.
गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटरद्वारे राखेची वाहतूक परळी शहरातुन केली जात होती व चालक मर्यादेपेक्षा जास्त राख गाडीमध्ये भरत असल्याने हि राख रस्त्याने उडत होती व नागरिकांना त्रास होउ लागला व आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन लोकं आजारी पडु लागले अतिरिक्त राख घेऊन जाणाऱ्या वाहन धारकावर सोमवार पासून कारवाई करण्यात येत आहे व दंड आकारण्यात सुध्दा येत आहे.
राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
-९७६५९२८२५९