चंद्रपूरचे वादग्रस्त-वसुलीबाज आमदार…??? जोरगेवारांच्या नावावर आरटीओ कडून वसुलीची खमंग चर्चा ! : अशोक मत्तेला रंगेहाथ अटक
चंद्रपूर : कायम आपल्या सर्कशी करामतीसाठी प्रसिद्धी असलेले आमदार किशोर जोरगेवार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत, कालच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याच्या बातम्या आल्या नंतर रात्री त्यांचा खंदा समर्थक अशोक मत्ते याने आमदारांच्या नावावर आर.टी. ओ.ऑफिस मध्ये पैशाची मागणी केल्याने आमदार जोरगेवार यांच्या नैतिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अशोक मत्ते नामक व्यति चंद्रपूर आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांना आमदारांची नावे सांगून महिनेवारी वसुली मागून त्रास देत असल्याने काल रात्री त्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली असता चंद्रपूर च्या लोकप्रिय आमदारांनी त्याला सोडा, पुन्हा तो अशी चूक करणार नाही अशी विनवणी पोलिसांना केल्याचे धक्कादायक वृत्त चर्चेत आहे. मात्र याबाबत पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी सरळ कोणतीही माहिती न देता फक्त अशोक मत्ते विरुद्ध एफआयआर दाखल झाल्याचे मान्य केले.
जोरगेवार यांनी मागच्या आठवड्यात कोट्यवधी ची दारू पकडून स्टंटबाजी केली, पण त्यात सुद्धा नागरिकांचे हित नसून केवळ नफेखोरी साठी त्यांनी हा प्रकार केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला, योग्य नफा मिळत नसल्यानेच त्यांनी दारू पकडण्याची स्टंटबाजी केली, असा आरोप विरोधक करत आहे त्याला आता वाव वाटत आहे.
महाविकास आघाडी ला समर्थन देऊन पण आपल्याला योग्य मान मिळत नाही, अशी नाराजी त्यांनी अनेकदा आपल्या कार्यकर्त्या समोर व्यक्त केली, आणि त्यातूनच त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आमदार आता राष्ट्रवादीत जाणार अशी हवा पसरवली.
जिल्ह्यातील दोन्ही वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी आपल्याला मान द्यावा ही त्यांची इच्छा असल्यानेच त्यांनी आशा बातम्या प्लांट केल्या. पण याचा उलटंच परिणाम आज दिसून आला, त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमात शहर काँग्रेस कडून ध्वजारोहण कार्यक्रमला उपस्थिती असे लिहून होते पण जोरगेवार यांनी त्याकडे पाठ फिरवली, आणि नंतर पोलीस ग्राउंड वरील शासकीय कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले पण पालकमंत्र्यांनी त्यांना नेहमी प्रमाणे यावर्षी आपल्या बाजूला स्थान दिले नाही त्यामुळे जोरगेवार यांच्यावर आता पालकमंत्र्यांची देखील नाराजी ओढवली आहे असे दिसते.
मागच्या महिन्यात समाजवादी पक्षाने त्यांच्या विरोधात आंदोलन करून 200 युनिट च्या मुद्यावरुन त्यांच्या कार्यालया समोरील पोस्टर ला काळे फासले होते. महत्वाची बाब म्हणजे आधी जोरगेवार भाजप मध्ये होते त्यांचे राजकीय गुरू मुनगंटीवार आहेत पण हेच मुनगंटीवार माझी कॉपी करतात असे हास्यास्पद विधान ते अनेक आपल्या समर्थकांसमोर खाजगीत बोलतात.
यांच्या बद्दल सतत कुरघोड्या करण्यात हे आघाडीवर असतात पण जिथे मुनगंटीवार उपस्थित असतात तिथून हे काढता पाय घेतात. आपल्याला भाजपच्या सर्व वरीष्ठ नेत्यांनी तिकीट देतो म्हंटल नितीन गडकरी यांनी स्वतः आपल्याला हे सांगितलं पण मुनगंटीवार यांनीच केवळ मी आमदार बनू नये म्हणून मला तिकीट मिळू दिली नाही असे जोरगेवार यांनी अनेक पत्रकारांना खासगीत सांगितले.
काँग्रेस आणि इतर पक्षाच्या सहकार्याने निवडून आलेले जोरगेवार यांनी निवडून येताच लगेच भाजप ला पाठिंबा देऊन कोलांटउडी घेतली होती. आज जोरगेवार यांची अवस्था बघून त्याना आता कुठलाही पक्ष पाठिंबा देणे कठीण वाटत आहे. जेव्हा पासून आमदार बनले तेव्हापासून जोरगेवार केवळ वादाच्या भोवऱ्यात राहतात, त्यामुळे पुढील काळात इतर सर्वपक्षीय नेते त्यांना जवळ करणार की नाही हे पुढील काळात बघण्यासारखे असेल. त्यामुळे “तेल गेलं तूप गेलं हाती आलं धुपारण” ही म्हण त्यांना चपखल लागू होते अस म्हणावं लागेल.