राजीव गांधी सागराचे पाणी नदीपात्रात लवकरात लवकर सोडा :-मा. तोपलाल रहांगडाले माजी सरपंच डोंगरी बुजुर्ग
Summary
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* वार्ता:-. पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार माननीय तोपलाल रहांगडाले माजी सरपंच डोंगरी बुजुर्ग यांनी माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आँनलाईन द्वारे निवेदन दिले.व एक प्रत भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील जी मेंढे […]
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* वार्ता:-. पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार माननीय तोपलाल रहांगडाले माजी सरपंच डोंगरी बुजुर्ग यांनी माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आँनलाईन द्वारे निवेदन दिले.व एक प्रत भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील जी मेंढे यांना पण निवेदनात दिली.
त्यांनी निवेदनात लिहिले होते की उष्ण तापमानात वाढ झाल्याने नदिच्या पात्राचे पाणी खोलवर गेले असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रादेशिक पाणीपुरवठा द्वारा नळाद्वारे पाणी येते ते कमी प्रमाणात येते मनुष्याला तर पाणी बरोबर मिळत नाही तर जनावरांना कुठुन पाणी मिळणार!
त्यामुळे पाण्याची टंचाई जास्त निर्माण होऊ नये म्हणून *राजीव सागर* परियोजनेचा पाणी नदीपात्रात लवकरात लवकर सोडावे अशी विनंती निवेदनात करण्यात आली.
याचा फायदा शेतकऱ्यांना चं नाही होणार तर सर्वांनाच होईल असे निवेदनात सांगण्यात आले.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-9765928259