आत्महत्या करण्यापेक्षा आऊटलेट्स च्या माध्यमातून मार्ग काढणे गरजेचे
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि 26 एप्रिल 2021
लाखो जीव घेणारा क्रूरकर्मा हिटलर ने पण आत्महत्या केली शेवटी. सुंदर विचार देणारे साने गुरुजी आत्मघात करुन घेतात.
मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे स्वामी विज्ञानानंद मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात. आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण करु कित्येकांना आधार देणारे भैय्युजी महाराज आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात. पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही सुशांत सिंग राजपुतनं आत्महत्या केली नैराश्यातुन आणि आता सहा आठ महिन्यापूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या शीतल आमटे करजगी आपलं जीवन संपवतात. ही झाली सेलिब्रिटींची उदाहरणं यातुन काय शिकायचं आपण.? पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरुन शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात .वर शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी फक्त त्याचे कष्ट त्यालाच माहित असतात .माणुस वर वर दिसतो तितका खंबीर असेलच असं नाही….मनात वेगळी खळबळ असु शकते त्याच्या, जी आपल्या पर्यंत पोहोचत नसते किंवा त्या आनंदी आणि सुखी चेहेर्याच्या आड लपवत असतो लपवण्याचा प्रयत्न करत असतो
शेवटी काय…?? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली पायात #कबरच आहे, हे विसरुन चालत नाही.
Outlet भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केल्या नंतर
ABP माझा चँनल ने एक परिचर्चा घडवून आणली होती.
त्यात बोलताना भय्यूजी महारांजाचे मित्र –
अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक “अध्यात्मीक” गूरू होते, परंतू ते एक व्यक्ती पण होते.
आपल्या मनातील “स्ट्रेस” बाहेर काढायला त्याच्या जवळ “outlet” नव्हता. आज परत डॉ. शितल आमटे (बाबा आमटे यांची नात त्याचं ही अगदी भैयु महाराज सारखं झाले)
ईतकं महत्वाचं असतं का हे outlet.? होय ! कोट्यावधी रूपये खर्च करून राणापिसा धरण बांधले ,
आणि समजा त्याला outlet च दिले नसते तर काय झाले असते.? अक्षरशः धरण फूटले असते.. इतकं महत्वाचं असते हे waste weir… मानवी शरीर म्हणजे विवीध पंचतत्वापासून सांधलेलेलं एक धरणच जणु ! या शरीरात समस्यांची आवक अती प्रमाणात झाली तर हे धरण फूटेल की राहील ? म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे outlet वापरून आपल्या समस्या, आई,पत्नी,मित्राजवळ सांगा आपल्या अंतर्मनाचं outlet Open करण्यासाठी
ध्यान साधनेचा अवलंब करा.
आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं outlet म्हणजे आपले डोळे उघडा ,
फुटून जाऊ द्या अश्रूचा बांध..
वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दूःख, उपेक्षा..
पिस्तौल च्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा
पंख्याला लटकण्यापेक्षा….
हे केव्हाही सोप्प…नाही का.?
म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या.
मन मोकळं करा. बेस्ट आउटलेट मित्र आणि मैत्रिणी हसा ! बोला ! रडा ! भांडा ! व्यक्त व्हा !! मुक्त व्हा.. !!