BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

स्वाभिमानीच्या सचिन शिंदे यांना शेकापचा पाठिंबा

Summary

मुंबई/ प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. १० एप्रिल २०२१ पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणूकीतून महाराष्ट्रात स्वतंत्र पुरोगामी पर्याय मजबूत करणार. सोलापूर पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीतून महाराष्ट्रात स्वतंत्र पुरोगामी पर्याय मजबूत करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलनातील सक्रीय कार्यकर्ते सचिन अरुण शिंदे […]

मुंबई/ प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. १० एप्रिल २०२१
पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणूकीतून महाराष्ट्रात स्वतंत्र पुरोगामी पर्याय मजबूत करणार. सोलापूर पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीतून महाराष्ट्रात स्वतंत्र पुरोगामी पर्याय मजबूत करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलनातील सक्रीय कार्यकर्ते सचिन अरुण शिंदे यांना शेतकरी कामगार पक्षातर्फे आज भक्कम पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील आणि भाई गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्रात स्वतंत्र पुरोगामी पर्याय मजबूत होण्यासाठी हा पाठिंबा स्वाभिमानीच्या सचिन शिंदे यांना जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत राहुन भांडवलदारधार्जिण्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षासह स्वाभीमानी शेतकरी संघटना व इतर पक्षांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती.मात्र या घटक पक्षांना सत्तेत कोणताही वाटा देण्याचे दूरच साधे शपथविधीसाठी निमंत्रण देण्याचे सौजन्यही आघाडीने दाखविले नव्हते.या पार्श्वभूमीवर पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीतून महाराष्ट्राला स्वतंत्र मजबूत पुरोगामी पर्याय देण्याच्या या भुमिकेला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *