चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

​🚨 ‘किलबिल’ शाळेत शिक्षकाचा मोठा ‘खेळ’! बोगस विद्यार्थी नोंदणीचा ‘बोफोर्स’ घोटाळा उघड?

Summary

चंद्रपूर (विशेष प्रतिनिधी): शिक्षण हे पवित्र क्षेत्र मानलं जातं, पण चंद्रपूरच्या रामनगर भागातील ‘किलबिल’ शाळेत चक्क विद्यार्थ्यांच्या नावावरच मोठा ‘भ्रष्टाचार’ शिजत असल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे. एका शिक्षकाने चक्क तेलंगणा राज्यातील विद्यार्थ्यांची बोगस नोंदणी करून शासनाची डोळेझाक केल्याचा गंभीर […]

चंद्रपूर (विशेष प्रतिनिधी):

शिक्षण हे पवित्र क्षेत्र मानलं जातं, पण चंद्रपूरच्या रामनगर भागातील ‘किलबिल’ शाळेत चक्क विद्यार्थ्यांच्या नावावरच मोठा ‘भ्रष्टाचार’ शिजत असल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे. एका शिक्षकाने चक्क तेलंगणा राज्यातील विद्यार्थ्यांची बोगस नोंदणी करून शासनाची डोळेझाक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

​🎬 काय आहे संपूर्ण ‘सस्पेन्स’?

तेलंगणा राज्यातील बावणगड्डा येथील दोन चिमुरडे, वासु देवा बानोत आणि नितीन देवा बानोत, जे कधी चंद्रपुरात पाऊलही ठेवले नाहीत, त्यांचे नाव किलबिल शाळेच्या हजेरी पटावर झळकले! शिक्षक नंदू रूपसिंग राठोड यांनी या दोन्ही मुलांची खोटी नोंदणी करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारदार नामदेव जगण माडोत यांनी केला आहे.

​🔥 टी.सी. चा ‘ट्विस्ट’ आणि आधार कार्डचा ‘लोचा’:

कथा इथेच संपत नाही! या शिक्षकाने परस्पर मुलांची टी.सी. काढून ती दुसऱ्या शाळेत दिली आणि पुन्हा ती स्वतःजवळ ठेवून घेतली. या ‘फर्जीवाड्या’मुळे त्या गरीब विद्यार्थ्यांचे आधार कार्ड चंद्रपूरला लिंक झाले असून, आता त्यांना स्वतःच्या गावात (तेलंगणा) प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लावून हा ‘बोफोर्स घोटाळा’ का करण्यात आला? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

​👊 कारवाईचा ‘क्लायमॅक्स’ काय असणार?

तक्रारदाराने थेट नागपूर आयुक्त आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे धाव घेतली असून, या भ्रष्ट शिक्षकाला तातडीने ‘बडतर्फ’ (Dismiss) करण्याची मागणी केली आहे. या शाळेत अजून किती विद्यार्थ्यांची अशी ‘हेराफेरी’ झाली आहे? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *