चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

आमदार सुधीर मुनगंटीवारांकडून शब्दपूर्ती! रामनवमीच्या शुभमुहूर्तावर विचोडा येथे ‘श्रीराम महाप्रवेशद्वारा’चे भूमिपूजन

Summary

५० लाखांच्या भव्य स्वागतगेटसह सुशोभीकरण कामाचा श्रीगणेशा; ग्रामस्थांचा जल्लोषात सत्कार ​चंद्रपूर (प्रतिनिधी): ‘दिलेला शब्द पाळणारा नेता’ ही आपली ओळख पुन्हा एकदा सिद्ध करत, राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी रामनवमीच्या पावन पर्वावर विचोडा ग्रामस्थांना […]

५० लाखांच्या भव्य स्वागतगेटसह सुशोभीकरण कामाचा श्रीगणेशा; ग्रामस्थांचा जल्लोषात सत्कार
चंद्रपूर (प्रतिनिधी): ‘दिलेला शब्द पाळणारा नेता’ ही आपली ओळख पुन्हा एकदा सिद्ध करत, राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी रामनवमीच्या पावन पर्वावर विचोडा ग्रामस्थांना दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. चंद्रपूर तालुक्यातील मौजा विचोडा (बू.) येथे ५० लक्ष रुपये निधीतून साकारल्या जाणाऱ्या भव्य ‘श्रीराम महाप्रवेशद्वार’ व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.

​भक्ती आणि विकासाचा अनोखा संगम
​कार्यक्रमाची सुरुवात आ. मुनगंटीवार यांनी राम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन केली. यावेळी लेझीम पथक, भजन आणि स्वागतगीतांच्या सुरावलीत ग्रामस्थांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. उपस्थितांना संबोधित करताना आ. मुनगंटीवार म्हणाले, “जानेवारी २०२६ मध्ये महादेव शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मी ग्रामस्थांना प्रवेशद्वाराचा शब्द दिला होता. प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या दिवशी ही शब्दपूर्ती होणे, हे माझ्यासाठी भाग्याचे आणि समाधानाचे आहे.”
​अयोध्या धर्तीवर होणार रचना
​या प्रवेशद्वाराच्या निर्मितीबाबत आ. मुनगंटीवार यांनी विशेष सूचना दिल्या आहेत. अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी चंद्रपुरातून पाठवण्यात आलेल्या काष्ठाच्या धर्तीवरच या प्रवेशद्वाराची भव्य व सुबक रचना असावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. यात आकर्षक चित्ररचना आणि दर्जेदार रंगसंगतीचा वापर करून गावाच्या संस्कृतीचे दर्शन घडवावे, असेही त्यांनी नमूद केले.
​विकासकामांचा धडाका: ६ कोटींचा रस्ता मार्गस्थ
​केवळ प्रवेशद्वारच नव्हे, तर गावाच्या दळणवळणाचा प्रश्नही आमदार मुनगंटीवार यांनी मार्गी लावला आहे. मार्च २०२४ मध्ये मंजूर झालेला परंतु प्रलंबित असलेला विचोडा ते छोटा नागपूर हा ९०० मीटरचा रस्ता आता ६ कोटी रुपये खर्चून २० एप्रिल २०२६ पासून युद्धपातळीवर सुरू होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
​पर्यावरण आणि भक्तीचा जागर
​भजन साहित्य वितरण: मतदारसंघातील २३० भजन मंडळांना साहित्याचे वितरण केल्याचे सांगत, भजनामुळे मानवी जीवनात चैतन्य निर्माण होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
​प्रदूषणमुक्त चंद्रपूर: १६ एप्रिल रोजी पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक प्रदूषणाकडे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
​वृक्ष लागवड मोहीम: १ जुलैपासून जिल्हाभर वृक्ष लागवडीचे महाअभियान राबवून शेतकऱ्यांच्या बांधावर झाडे लावण्याचे आवाहन त्यांनी केले.
​उपस्थित मान्यवर:
या सोहळ्याला मुख्य वनसंरक्षक रामानुजम, विभागीय वन अधिकारी पाठक, कार्यकारी अभियंता पगारे, ग्रामपंचायत प्रशासक माधुरी सागोरे, आयोजक अनिल डोंगरे, रवी लोणकर, विक्की लाडसे, शोभाताई पिदुरकर यांच्यासह वन विभाग, बांधकाम विभागाचे अधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *