गोंदिया महाराष्ट्र हेडलाइन

सरस्वती विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

Summary

अर्जुनी मोर. : स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जे. डी. पठाण हे होते. या कार्यक्रमाला उपप्राचार्या अर्चना […]

अर्जुनी मोर. : स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जे. डी. पठाण हे होते.
या कार्यक्रमाला उपप्राचार्या अर्चना गुरूनुले, पर्यवेक्षक शिवचरण राघोते, जी. एम. बी. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शव्या जैन, सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना भुते, समन्वयक भगीरथ गांधी, वरिष्ठ शिक्षक कुंडलिक लोथे, प्रा. टोपेश बिसेन यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य जे. डी. पठाण यांनी शिवाजी महाराजांच्या शिस्तप्रिय, संस्कारित व दूरदर्शी नेतृत्वाचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारावा, असे प्रतिपादन केले.
प्राचार्या शव्या जैन यांनी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांप्रमाणे धाडस, आत्मविश्वास आणि राष्ट्रनिष्ठा आत्मसात करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग कथन केले. तसेच सरस्वती विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित नाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. पाखी शहारे या विद्यार्थिनीने सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमाला रंगत आणली.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जी. एम. बी. विद्यालयातील इयत्ता नववीची विद्यार्थिनी अहिंसा बोरकर हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *