BREAKING NEWS:
चन्द्रपुर महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

वंचित बहुजन आघाडीची चंद्रपूर शहर कार्यकारिणी बरखास्त शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणी रद्द

Summary

चंद्रपूर | प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीच्या चंद्रपूर शहर संघटनात्मक रचनेत महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेली चंद्रपूर शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची अधिकृत घोषणा पक्षाने केली आहे. यासंदर्भात पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या महत्त्वाच्या सूचनेनुसार […]

चंद्रपूर | प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीच्या चंद्रपूर शहर संघटनात्मक रचनेत महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेली चंद्रपूर शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची अधिकृत घोषणा पक्षाने केली आहे. यासंदर्भात पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या महत्त्वाच्या सूचनेनुसार हा निर्णय तत्काळ अंमलात आणण्यात आला आहे.
पक्ष संघटनेत शिस्त, कार्यक्षमतेत वाढ आणि आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाची नोंद घ्यावी, असे आवाहन सूचनेत करण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव किशन चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या पत्रकात, पक्ष संघटनेच्या पुनर्रचनेचा भाग म्हणून ही कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. लवकरच नव्या शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार असल्याची शक्यता पक्षातील सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या निर्णयामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी कोणते नवे चेहरे आणि जबाबदाऱ्या पुढे येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, संघटनात्मक बदलामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा पक्ष नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *