भंडारा जिल्ह्यात अवैध दारू व जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा कडक प्रहार ₹5.29 लाखांचा मुद्देमाल जप्त; कारधा, तुमसर, गोबरवाही, लाखनी, लाखांदुर येथे कारवाई
भंडारा | प्रतिनिधी
जिल्ह्यातील अवैध दारू व जुगार व्यवसाय समूळ नष्ट करण्याच्या स्पष्ट आदेशानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत ₹5,29,385 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कारधा पोलीस ठाणे
पोलीस ठाणे कारधा येथे अप.क्र. 42/2026, कलम 65 (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये
आरोपी श्रीमती सिताबाई रामा मेश्राम (वय 65, रा. कोका जंगल) हिच्या ताब्यातून
10 लिटर मोहाफुलाची हातभट्टी दारू (प्रति लिटर ₹200) असा ₹2,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तुमसर पोलीस ठाणे
पोलीस ठाणे तुमसर येथे अप.क्र. 52/2026, कलम 65 (ई) म.दा.का. अंतर्गत
विधीसंघर्षग्रस्त बालक राकेश पृथ्वीराज शेंडे (वय 17 वर्षे 4 महिने, रा. सुदरटोला, गोबरवाही) याच्याकडून मोठ्या प्रमाणावर देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली.
यामध्ये विविध कंपन्यांची देशी दारू, विदेशी बिअर, विदेशी दारू, एक चारचाकी वाहन (₹5 लाख) व अँड्रॉइड मोबाईल असा एकूण ₹5,22,500 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोबरवाही पोलीस ठाणे
पोलीस ठाणे गोबरवाही येथे अप.क्र. 35/2026, कलम 65 (म) म.दा.का. अंतर्गत
आरोपी कैलास चंद्रभान उईके (वय 35, रा. कारली, ता. तुमसर) याच्याकडून
5 लिटर मोहाफुलाची हातभट्टी दारू असा ₹1,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लाखनी पोलीस ठाणे
पोलीस ठाणे लाखनी येथे अप.क्र. 25/2026, कलम 65 (ई) म.दा.का. अंतर्गत
आरोपी अविनाश शामराव कान्हेकर (वय 29, रा. केसलवाडा वाघ) याच्या घरातून
18 देशी दारूचे प्लास्टिक पव्वे जप्त करून ₹720 चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
लाखांदुर पोलीस ठाणे – जुगार अड्ड्यावर धाड
पोलीस ठाणे लाखांदुर येथे अप.क्र. 16/2026, कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये
आरोपी सुरेश शिवराम दोनाडकर (वय 39, रा. पाचगाव) याच्याकडून
नगदी रक्कम, सट्टापट्टी कागद व डॉटपेन असा ₹1,065 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस प्रशासनाचा इशारा
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की,
“भंडारा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा अवैध दारू किंवा जुगार व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही. अशा कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहतील.”
या संपूर्ण कारवाईत संबंधित पोलीस ठाण्यांचे ठाणेदार व पोलीस अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेतला.
संकलन:- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
