सार्वजनिक न्यासांवर प्रशासकांच्या नेमणुकीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत नावे कळविण्याचे आवाहन
Summary
मुंबई, दि. 27 : सार्वजनिक न्यासांवर अनेकवेळा प्रशासक, सुयोग्य व्यक्ती, काळजीवाहू व्यक्ती यांची नेमणूक करावी लागते. यासाठी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश, सेवानिवृत्त धर्मादाय आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, धर्मादाय विभागातून सेवानिवृत्त झालेले अधीक्षक किंवा निरीक्षक यांचे स्वतंत्र पॅनल तयार करण्यात […]
मुंबई, दि. 27 : सार्वजनिक न्यासांवर अनेकवेळा प्रशासक, सुयोग्य व्यक्ती, काळजीवाहू व्यक्ती यांची नेमणूक करावी लागते. यासाठी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश, सेवानिवृत्त धर्मादाय आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, धर्मादाय विभागातून सेवानिवृत्त झालेले अधीक्षक किंवा निरीक्षक यांचे स्वतंत्र पॅनल तयार करण्यात येणार आहे. यासाठी अशाप्रकारे नमूद केलेल्या इच्छूक व्यक्तींनी आपली नावे 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत धर्मादाय आयुक्त कार्यालय, दुसरा माळा, सस्मिरा इमारत, सस्मिरा मार्ग, वरळी, मुंबई येथे कळविण्यात यावी, असे आवाहन धमार्दाय आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
0000
