BREAKING NEWS:
चन्द्रपुर महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

रिपब्लिकन सेनेच्या ठोस पाठपुराव्याला यश; चिमूर–माकोना बस सेवा अखेर सुरू

Summary

चिमूर | प्रतिनिधी चिमूर तालुक्यातील सावरी व माकोना परिसरातील प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर न्याय मिळाला असून, रिपब्लिकन सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर चिमूर ते माकोना ही अत्यंत आवश्यक बस सेवा आजपासून अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनात्मक भूमिकेची दखल घेत […]

चिमूर | प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील सावरी व माकोना परिसरातील प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर न्याय मिळाला असून, रिपब्लिकन सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर चिमूर ते माकोना ही अत्यंत आवश्यक बस सेवा आजपासून अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनात्मक भूमिकेची दखल घेत चिमूर आगार प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर बस सेवा नसल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि ग्रामस्थांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. परिणामी वेळ, पैसा आणि सुरक्षिततेच्या अडचणी वाढल्या होत्या. ही समस्या लक्षात घेऊन रिपब्लिकन सेनेचे चिमूर तालुका अध्यक्ष जगदीश मेश्राम यांनी आगार प्रमुखांकडे सातत्याने निवेदने देत ठाम पाठपुरावा केला होता.
आज पहिली बस सुरू होताच सावरी व माकोना परिसरात आनंदाचे वातावरण पसरले. ग्रामस्थांनी या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करत रिपब्लिकन सेनेच्या भूमिकेचे कौतुक केले. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी ये-जा सुकर झाल्याने पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
बस सेवा सुरू झाल्याबद्दल सावरी ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच सावरी व माकोना येथील ग्रामस्थांनी जगदीश मेश्राम आणि रिपब्लिकन सेनेचे जाहीर आभार मानले. “जनतेच्या दैनंदिन प्रश्नांसाठी रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरून लढा उभारते, याचे हे ठोस उदाहरण आहे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटल्या.
यावेळी बोलताना जगदीश मेश्राम म्हणाले, “जनतेच्या प्रश्नांसाठी रिपब्लिकन सेना सदैव तत्पर आहे. चिमूर–माकोना बस सेवा सुरू होणे हे केवळ एक पाऊल आहे. तालुक्यातील इतर प्रलंबित प्रश्नांसाठी आमचा संघर्ष सुरूच राहील.”
या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतुकीत सुधारणा होऊन ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

संकलन:- श्री राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक तथा डायरेक्टर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *