महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा २८ जुलै रोजी शपथविधी; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे नवनिर्वाचित सदस्यांना देणार शपथ

Summary

मुंबई 27 – विधानपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा 28 जुलै रोजी शपथविधी होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देणार आहेत. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी  दि. 12 जुलै 2024  रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय […]

मुंबई 27 – विधानपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा 28 जुलै रोजी शपथविधी होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देणार आहेत.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी  दि. 12 जुलै 2024  रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव या निवडून आलेल्या  नवनिर्वाचित सदस्यांचा रविवार दि. 28 जुलै, 2024 रोजी विधानभवनातील सेंट्रल हॉल  येथे सकाळी 11 वाजता  शपथविधी होणार आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *