ठाणे महाराष्ट्र हेडलाइन

श्री ठाणे जैन महासंघाच्या रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला झेंडा मुख्यमंत्र्यांनी जैन बांधवांना दिल्या महावीर जयंतीच्या शुभेच्छा

Summary

ठाणे, दि. 4 (जिमाका) :- महावीर जयंतीनिमित्त श्री ठाणे जैन महासंघाने आयोजित केलेल्या रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी त्यांनी जैन बांधवांशी संवाद साधला.             मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी, “भगवान महावीरांचे विचार आचरणात आणून मार्गक्रमण करणारा जैन समाज […]

ठाणेदि. 4 (जिमाका) :- महावीर जयंतीनिमित्त श्री ठाणे जैन महासंघाने आयोजित केलेल्या रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी त्यांनी जैन बांधवांशी संवाद साधला.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी, भगवान महावीरांचे विचार आचरणात आणून मार्गक्रमण करणारा जैन समाज शांतताप्रिय समाज आहे. या समाजाने क्षमाशील वृत्ती जोपासून मानवजातीच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्याला प्राधान्य दिले आहे. आज भगवान महावीरांच्या जयंतीदिनी त्यांचे हेच विचार आपणा सर्वांना प्रेरणादायी ठरावेतअशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.

            यावेळी आमदार प्रताप सरनाईकआमदार संजय केळकरआमदार निरंजन डावखरेसंदीप लेले आणि श्री ठाणे जैन महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *