BREAKING NEWS:
भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

वरठी येथे प्रभु श्री रामनवमी निमित्य खीर व शरबत वाटप आमदार मा.राजू माणिकरावजी कारेमोरे

Summary

दिनांक 30 मार्च 2023 रोज गुरूवार ला सायंकाळी 6 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वरठी येथे प्रभु श्री रामनवमी निमित्त मा.श्री.आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे तुमसर-मोहाड़ी विधानसभा क्षेत्र यांच्या तर्फे खीर व शरबत वाटप कार्यक्रम आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाप्रसंगी सौ. रंजीताताई […]

दिनांक 30 मार्च 2023 रोज
गुरूवार ला सायंकाळी 6 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वरठी येथे प्रभु श्री रामनवमी निमित्त मा.श्री.आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे तुमसर-मोहाड़ी विधानसभा क्षेत्र यांच्या तर्फे खीर व शरबत वाटप कार्यक्रम आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाप्रसंगी सौ. रंजीताताई राजू कारेमोरे समाजसेविका तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला, त्यावेळी सौ. रंजीताताई राजू कारमोरे यांनी प्रभु श्री राम याचा फोटोला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले,सर्वांना ‘श्रीराम नवमी’च्या मनःपूर्वक शुभेच्छा! प्रभू श्रीराम हे पितृवचन, मातृवचन, एकवचनी आणि आदर्श व्यक्तिमत्त्व होते. प्रभू रामचंद्रांच्या विचारांचे अनुकरण करून आपण सुद्धा आपले जीवन सुखी, समृद्ध करूया. भगवान श्रीरामांचे आशीर्वाद सदैव सर्वांवर राहो. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पदाधिकारी, समाजसेविका, सामाजिक कार्यकर्ता, महिला भगिनी, बाल गोपाल, बूथ प्रमुख,वरठी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच उपसरपंच, युवक गंण, ग्रामवासी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *