राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षक रत्न सन्मान पुरस्कार 2021 मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई तर्फे या वर्षीचा राज्यस्तरीय शिक्षक रत्न सन्मान पुरस्कार
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई तर्फे या वर्षीचा राज्यस्तरीय शिक्षक रत्न सन्मान पुरस्कार विनोद विठोबा लांडगे विषय शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेंढरी कोके तालुका शिंदेवाही जिल्हा चंद्रपूर यांना प्राप्त झालेला आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या उपक्रमाची दखल घेऊन प्राप्त झालेला आहे. लेखन, कला, विज्ञान वक्तृत्व , शिक्षकाने शाळेच्या उन्नतीसाठी समाजाकडून मिळवलेला लोकसहभागातून, प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे सत्संग कॉन्व्हेंट निर्मिती (लोकसहभागातून) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे भव्य मैदान, सुंदर गार्डन *स्वच्छ शाळा सुंदर शाळा* 2013 ला शासनाकडून पुरस्कार व रोख रक्कम 50 हजार रुपये. पायाभूत चाचणीत वर्गाची उत्तम सरासरी , खो- खो खेळात जिल्हास्तरावर 5 दा प्रतिनिधित्व दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक , नवोदय साठी करण मडावी यांची निवड ,शिक्षण हक्क कायद्यानुसार 10 घटकांची पूर्तता , ‘शाळा बंद शिक्षण सुरू’ हा उपक्रम,2021 मध्ये ‘ *झाडाखालची शाळा* हा उपक्रम सुरू त्यांच्या या विविध उपक्रमाची दखल घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यावर्षी राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षक रत्न सन्मान पुरस्कार 5 sept जाहीर केलेला आहे. त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, शाळेतील मुख्याध्यापक त्यांचे सहकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .
आपला
विनोद लांडगे
