CSTPS कर्मचाऱ्यांच्या पगारावर डल्ला! DGM HR आणि सोसायटीच्या ‘जुगलबंदी’चा पर्दाफाश: 500 रुपयांच्या ‘लूट’ विरोधात कर्मचारी संघटना आक्रमक!
चंद्रपूर: चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात (CSTPS) सध्या एका धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. आपल्या कष्टाच्या पैशांवर कोणाचा तरी डल्ला पडल्याचे लक्षात येताच कर्मचारी आणि अधिकारी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे. माहे मे 2026 च्या पगारातून कोणतीही पूर्वसूचना न देता, परस्पर 500 रुपयांची केलेली कपात म्हणजे कर्मचाऱ्यांची एक प्रकारे ‘आर्थिक लूट’च असल्याचा आरोप होत आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारातून 500 रुपयांची रक्कम अनाकलनीय कारणास्तव कापण्यात आली आहे. हा प्रकार ‘चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था’ आणि ‘मानव संसाधन विभाग’ (DGM HR) यांच्या संगनमताने झाल्याचा आरोप केला जात आहे. या कथित ‘जुगलबंदी’मुळे कर्मचाऱ्यांच्या खिशातून थेट हात घातला गेल्याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे.
’जुगलबंदी’चा गेम हाणून पाडण्याचा संघटनांचा निर्धार
या अन्यायी कपातीविरुद्ध आता ‘बहुजन पॉवर कर्मचारी संघटना’ आक्रमक पवित्रा घेत मैदानात उतरली आहे. या संघटनेने प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की, जोपर्यंत प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याला त्यांचे 500 रुपये परत मिळत नाहीत, तोपर्यंत संघटना शांत बसणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची लक्तरे वेशीवर टांगण्यासाठी संघटनेने कंबर कसली आहे.
आता न्यायालयीन आणि प्रशासकीय लढाई?
हा ‘जुगलबंदी’चा खेळ उधळून लावण्यासाठी संघटनेने रणशिंग फुंकले आहे. केवळ निवेदनावर न थांबता, संघटनेने खालीलप्रमाणे पुढील रणनीती आखली आहे:
माहिती अधिकाराचा वापर (RTI): या कपातीमागील नेमका गौडबंगाल शोधण्यासाठी RTI द्वारे माहिती काढण्याची तयारी.
प्रशासकीय तक्रार: आवश्यक पडल्यास सहाय्यक निबंधक (AR/DDR) कार्यालयापर्यंत धाव घेण्याचा संघटनेचा मानस आहे.
”कर्मचाऱ्यांची ही लूट आम्ही कदापि सहन करणार नाही,” असा पवित्रा घेत संघटनेने या लढाईत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना सोबत घेण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणातील ‘खलनायक’ कोण आहेत आणि कपातीचे अधिकृत आदेश नेमके कोणाचे होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रशासनाच्या या ‘मनमानी’ कारभाराला आता कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा लगाम बसेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!
संपादकीय टिप्पणी: कर्मचाऱ्यांच्या हक्काचा एक रुपयाही असा अनाधिकृतपणे कापला जाणे ही गंभीर बाब आहे. पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील.
- राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक
