वैदू स्मशान भूमी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार इम्रान सय्यद,शैलेश बोईनवाड नगरसेवक.
* पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता लातूर :-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार * वैदू स्मशान भूमीत *लाईटची व पाण्याची व्यवस्था नसल्याची स्मस्या कृती समितीने समाज माध्यमाच्या माध्यमातून समोर आणल्यानंतर स्थानिक नगरसेवक इम्रान सय्यद ,शैलेश बोविंदवाड यांनी भर उन्हात वैदू स्मशान भूमिस भेट देऊन समस्या जाणून घेतल्या व या वेळी उपस्थिती मनपा कर्मचारी रोड कारकून सुहास भिकाने , यांना परिसरात जीसीबीच्या साह्याने स्वच्छता मोहीम राबऊन ,पाण्याची टाकी व लाईटची व्यवस्था करण्याच्या सूचना देऊन वैदू समाज स्मशान भूमी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले या वेळी कृती समितीचे बाबासाहेब बनसोडे,दीपक गंगणे,अॅड. आनंद सोनवणे,राज धनगर, गौतम ससाणे ,भगवेश्वर धनगर इत्यादी उपस्थित होते..
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-९७६५९२८२५९