BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

विदर्भात उन्हाचा झपाटा वाढला, चंद्रपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद कडक निर्बंधामुळे शीतपेय, आईस्क्रीम मिळेना पारंपारिक दही, ताक, लिंबू पाणी, उसाचा रस, कोकम सरबत, ज्युस, टरबूजकडे नागरिकांचा वाढला कल

Summary

राजुरा – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिल पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्येही वाढ होत आहे. त्यासोबत विदर्भात आता उन्हाचा तडाखा वाढत आहे. विदर्भातील चंद्रपूरचे तापमान 44.1 अंशावर, तर राजुरा, सास्ती कोळस्याच्या खाणी असल्या मुळे तापमान […]

राजुरा – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिल पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्येही वाढ होत आहे. त्यासोबत विदर्भात आता उन्हाचा तडाखा वाढत आहे. विदर्भातील चंद्रपूरचे तापमान 44.1 अंशावर, तर राजुरा, सास्ती कोळस्याच्या खाणी असल्या मुळे तापमान सर्वाधिक 45.9 वर पोहोचले आहे.
गेल्या आठवड्यात विदर्भातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला होता. त्यामुळे उष्म्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील शहरांचे व कोळस्याच्या खाणी संलग्न असणाऱ्या गावात तापमान वाढत आहे. पुढील आठवड्यात तापमान आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोरोनामुळे जनता संकटात सापडली आहे. लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर पडता येत नाही. अशामध्येच आता तापमान वाढत असल्याने गरमी होत आहे. वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. उन्हापासून थंडावा देणारी शीतपेयाची दुकानं बंद आहेत. शीतपेयही, आईस्क्रीम मिळत नसल्यामुळे, उन्हाळ्यात शरीराचे तापमान कमी करण्यासाठी पारंपारिक दही, ताक, लिंबू पाणी, उसाचा रस, कोकम सरबत, ज्युस, टरबूजकडे नागरिकांचा वाढला आहे.

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *