लोखंडीच्या कोविड रुग्णालयात फॅबिफ्लू गोळ्या आणि रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जिल्हा शल्य चिकित्सकांचे अक्षम्य दुर्लक्ष; अत्यावश्यक औषधी उपलब्ध करून देण्याची आ. मुंदडांची मागणी
Summary
मुंबई :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. १०.मे.२०२१ अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवर उपचारासाठी अत्यावश्यक असलेल्या फॅबिफ्ल्यू गोळ्या आणि रेमडेसीवीर इंजेक्शनचा सातत्याने तुटवडा निर्माण होत आहे. जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांचे या […]
मुंबई :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. १०.मे.२०२१
अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवर उपचारासाठी अत्यावश्यक असलेल्या फॅबिफ्ल्यू गोळ्या आणि रेमडेसीवीर इंजेक्शनचा सातत्याने तुटवडा निर्माण होत आहे. जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांचे या रुग्णालयाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी लोखंडीच्या रुग्णालयात त्वरित औषधी आणि इंजेक्शन उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.