BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीदिनी सर्वधर्म प्रार्थना कार्यक्रम

Summary

मुंबई, दि. 2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयाशेजारील उद्यानात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सर्वधर्म प्रार्थना कार्यक्रम झाला. यावेळी विविध धर्मगुरुंनी प्रार्थना सादर केल्या. महात्मा गांधी स्मारक समितीचे सचिव देवराज सिंग यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून […]

मुंबई, दि. 2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयाशेजारील उद्यानात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सर्वधर्म प्रार्थना कार्यक्रम झाला. यावेळी विविध धर्मगुरुंनी प्रार्थना सादर केल्या. महात्मा गांधी स्मारक समितीचे सचिव देवराज सिंग यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी खासदार वर्षा गायकवाड, आमदार अमिन पटेल यांनीही महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महात्मा गांधी स्मारक समितीचे सदस्य सुमन पवार, प्रो. अमरसिंग, रवि बनेरा यांच्यासह कुलाबा महानगर पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, परिसरातील नागरिक यांनीही महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *