मराठा,OBC समाजाला हे सत्य कळू दे..!”मनुस्मृतिच्या समर्थकांची संस्कृति” -डॉ.आ.ह.साळुंके..यांचे विचार.
मुंबई :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 9 मे. 2021
_________________________
होय आम्ही हिंदू च आहोत..! पण कोणत्या वर्गात बसणारे आजकाल आमच्या तरुण मुलांना “ गर्व से कहो हम हिंदू है” असे म्हणायला शिकविले जाते.
मी म्हणतो आम्ही हिंदू आहोत..म्हणजे नेमके कोण आहोत ? हिंदुत्वाने आमच्या वाटेला काय दिले? आम्ही हिंदू आहोत म्हणजे कितव्या दर्जाचे हिंदू आहोत? वेद, जर आमचे म्हणजे आमच्या हिंदू धर्माचे धर्म ग्रंथआहेत तर आम्हाला वेदाचे मंत्र ऐकण्याचा अधिकार कां नव्हता ? चुकून आम्ही वेदातील मंत्र ऐकले तर आमच्या कानात गरम, तापलेले शिसे ओतावे,
वेदातील मंत्र म्हटल्यास आमची जीभ छाटावी अशा शिक्षा आम्हाला आमच्याच धर्मग्रंथात
का सांगण्यात आल्या?बहुजनांचा बळीराजा याला पाताळात कुणी व का गाडले ?छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध कुणी व का केला ? आमचे शिवराय हिंदू नव्हते काय? छत्रपती संभाजी महाराज यांना मनुस्मृती प्रमाणे मृत्यूची शिक्षा दिली कोणाच्या सांगण्यावरून? शंभू राजे हिंदू नव्हते का ?
संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज यांना त्रास कुणी व का दिला ? आमचे संत
हिंदू नव्हते काय? ज्या धर्माच्या व धर्मग्रंथांच्या आधारावर हिंदू धर्माचे धर्ममार्तंड छञपती शिवाजी महाराज शुद्र आहेत म्हणून शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करतात. ज्या लोकांनी आमच्या पूर्वजांना..राजांना सोडले नाही, ते लोक आमचे कसे होऊ शकतात ? संभाजी महाराजांनी शुद्र-अतिशुद्रातील भेद ओळखला होता.. आम्ही शुद्र आहोत हे सत्य स्वीकारले होते.म्हणूनच त्यांनी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिले व विषप्रयोग करण्याचे कारस्थान करणाऱ्या ब्राम्हणांना देह दंड दिला म्हणून त्यांची हत्या मनुस्मृती प्रमाणे नख उखडून, चामडी सोलून, डोळे फोडून शरीर छिन्नविछिन्न करून करतात.
संत तुकारामा सारख्या महात्म्याच्या गाथा नदीत बुडवितात व त्यांची हत्या सुद्धा करतात, संत नामदेवा सारखा विद्वान माणूस ज्याचे ६२ अभंग शीख लोकांच्या गुरुग्रंथ साहिब ह्या धर्मग्रंथात समाविष्ट केलेले आहेत, म्हणजे शीख लोकांनी त्यांना धर्मगुरूचा दर्जा दिलेला आहे अशा संत नामदेव महाराजांना ते शुद्र ( शिंपी) होते, म्हणून मंदिरात कीर्तन करीत असतांना लाथा, बुक्क्या मारून हाकलून देतात, जो हिंदु धर्म आणि ज्याचे धर्मग्रंथ आमच्या महापुरुषांना म्हणजेच आमच्या मायबापांना अशी वागणूक देतो तो धर्म आमचा धर्म असूच शकत नाहीत.आमचा धर्म आम्हाला अशी वाईट वागणूक कशी काय देतो ?? ( सदर्भ:”मनुस्म्रुतीच्या समर्थकांची संस्क्रुती डाँ.आ.ह.साळुंखे )