BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

*नांदोरी (नंदापूर) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मनोज बनसोड यांची अविरोध निवड*

Summary

*नागपूर* : सावनेर तालुक्यातील बडेगाव विभागाच्या नांदोरी (नंदापूर) या गट ग्रामपंचायतीच्या आज संपन्न झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत मनोज रामचंद्र बनसोड यांची सरपंचपदी अविरोध निवड झाली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीमध्ये या ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे अनुसूचितजमाती( महिला)साठी राखीव होते, परंतू निवडून […]

*नागपूर* : सावनेर तालुक्यातील बडेगाव विभागाच्या नांदोरी (नंदापूर) या गट ग्रामपंचायतीच्या आज संपन्न झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत मनोज रामचंद्र बनसोड यांची सरपंचपदी अविरोध निवड झाली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीमध्ये या ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे अनुसूचितजमाती( महिला)साठी राखीव होते, परंतू निवडून आलेल्या सात सदस्यांमध्ये अनुसूचित जमातीचा एकही सदस्य नसल्याने ८ मार्चला पुन्हा सावनेर तहसील कार्यालयात नव्याने आरक्षणाची सोडत घेण्यात आली. त्यात ईतर मागासवर्गीय (सर्वसाधारण) व अनुसूचित जाती (सर्वसाधारण) अश्या दोन चिठ्ठ्या टाकण्यात आल्या होत्या, त्यात ईश्वर चिठ्ठीने अनुसूचित जाती (सर्वसाधारण) हे पद सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज नांदोरी ग्रामपंचायत येथे निवडणूक पार पडली. नुकत्याच संपन्न झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेसचे व मंत्री सुनील केदार समर्थीत ७ पैकी ७ ही उमेदवार निवडून आले होते. सात सदस्यांमध्ये मनोज बनसोड हे अनुसूचित जातीचे एकमेव सदस्य असल्याने त्यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली. मनोज बनसोड हे त्यांचा मनमिळावू स्वभाव व लोकप्रियतेमुळे ग्रामपंचायत मध्ये सतत तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत, त्यांनी याआधीही या ग्रामपंचायतचे पांच वर्ष सरपंच पद भूषविलेले आहे हे विशेष.
मनोज बनसोड यांच्या निवडीबद्दल प्रशांत ताजने, बाबा घोरमारे, ज्ञानेश्वर दराडे, आनंदराव चौधरी, तुळशीराम पाटील, दिवाकर ढोके, अशोक मुरकुटे, दिवाकर पिंगे, विजय पिंगे, प्रफुल मुरकुटे, रोशन येलेकर, सूरज मुरकुटे, स्वप्निल फुलझेले,यशवंत चौधरी यांनी अभिनंदन केले तर मनोज बनसोड यांनी सरपंचपदी निवडून आल्याबद्दल राज्याचे मंत्री व सावनेर क्षेत्राचे आमदार सुनील केदार, खापरखेडा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप बनसोड, साहेबराव धोटे यांचे मनापासून आभार मानले आहे
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9158239247

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *