BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

तेजस संस्था व्दारे कन्हान व सत्रापुर ला गरजु ना अन्नदान केले. तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी चा सेवाभावी कौतुकास्पद उपक्रम.

Summary

कन्हान : – तेजस संस्था कामठी व्दारे परिसरातील दात्या कडुन गहु, तांदुळ गोळा करून अंपग, गरिब, निराधार गरजु लोकांना अन्नधान्य दान या उपक्रमां तर्गत कन्हान व सत्रापुर येथील अंत्यत गरजु लोकांना गहु, तांदुळाचे अन्नधान्य दान करण्यात आले. डिसेंबर २०२० ला […]

कन्हान : – तेजस संस्था कामठी व्दारे परिसरातील दात्या कडुन गहु, तांदुळ गोळा करून अंपग, गरिब, निराधार गरजु लोकांना अन्नधान्य दान या उपक्रमां तर्गत कन्हान व सत्रापुर येथील अंत्यत गरजु लोकांना गहु, तांदुळाचे अन्नधान्य दान करण्यात आले.
डिसेंबर २०२० ला कामठी येथे दोन सग्या बहिनी चा भुकेने व्याकुळ होऊन घरीच मुत्यु झाला होता. अशी दुर्दैवी घटना भविष्यात कधी घडु नये करिता दखल घेत तेजस बहुउद्देशिय संस्था कामठी व्दारे दानदात्या कडुन गहु, तांदुळ गोळा करून अंपग, गरिब, निराधार गरजु लोकांना अन्नधान्य दान करण्या चा “भुकेल्यास एक मुठ अन्न आपले ” या उपक्रमाचा साई मंदीर कामठी-कन्हान येथे दिनांक २६ जानेवारी २०२१ ला सुरू करून फेब्रुवारी पासुन दर महिन्याच्या ३ तारखेनंतर गरजु कडे जावुन अन्नधान्य दान करणे नियमित सुरू आहे. यांच उपक्रमांतर्गत दिनांक ४, ५, ६, व ७ मे २०२१ ला कामठी च्या अंपग, गरिब, निराधार गरजु लोकांना अन्नधान्य दान करण्यात आले. बुधवार (दि.१२) ला कन्हान पोलीस स्टेशन सामोर परी पो उप अधिक्षक, कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांचे हस्ते व डॉ. पं दे रा शि प राज्य उपाध्य क्ष शांताराम जळते, ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, कमलसिंह यादव, ऋृषभ बावनकर, तेजस संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार, उपाध्यक्ष देवीदास पेटारे, सदस्य मिस्बाहऊर रहमान आदीच्या उपस्थितीत निराधार, गरीब गरजुना गहु व तादुळाचे अन्नधान्य दान करण्यात आले. तसेच सत्रापु र येथील गरजुना सुध्दा तेजस संस्थेचे अध्यक्ष व पदा धिका-यांचे हस्ते १०-१० किलो गहु , तांदुळाचे अन्न धान्य वितरण करण्यात आले. तेजस संस्थेच्या ” भुके ल्यास एक मुठ अन्न आपले ” या उपक्रमास कामठीचे पोलीस निरिक्षक विजय मलाचे, महेंद्र भुटानी, सुनील चोखारे, प्रविण शर्मा बुट्टीबोरी, राजु अग्रवाल, बबलु तिवारी, रोशन क्षीरसागर, विजय कोंडुलवार, सागर मदनकर, संदीप यादव, शुधोधन पाटिल, प्रमोद टेंबुर्नि कर, जयराज कोंडूलवार, चंद्रशेखर अरगुलेवार, देवी दास पेटारे, विनोद कास्त्री यांच्या कडुन दान घेऊन निराधार, अंपग, गरजु नागरिकांना दर महिन्याला वितरण करित तेजस संस्थेचा हाथ सदैव मानवते करिता प्रर्यंत्नशिल आहे.

✍🏼नंदलाल यादव
कामठी तालुका प्रतिनिधी
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *