BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

डॉक्टर आणि आमदार होळी साहेब सरकार होते तेव्हा..शेतकरी, विज बिल, आरोग्य विषयक समस्या दिसल्या नाही का❓❓

Summary

कोरोना काळातील विज बिल माफ करावे, विज बिलाची वसुली , शेतकऱ्यांच्या धान खरेदी चा प्रश्न , राज्यातील कंत्राटी NHM कर्मचाऱ्यांचे प्रश्न यासारख्या अनेक समस्या महाराष्ट्र राज्यात आणि केंद्रात आपल्या राजकीय पक्षाचे सरकार असतांना नव्हत्या ❓त्यावेळी आपण??? दौरे, बैठका, भूमीपूजन, उद्घाटन, […]

कोरोना काळातील विज बिल माफ करावे, विज बिलाची वसुली , शेतकऱ्यांच्या धान खरेदी चा प्रश्न , राज्यातील कंत्राटी NHM कर्मचाऱ्यांचे प्रश्न यासारख्या अनेक समस्या महाराष्ट्र राज्यात आणि केंद्रात आपल्या राजकीय पक्षाचे सरकार असतांना नव्हत्या ❓त्यावेळी आपण??? दौरे, बैठका, भूमीपूजन, उद्घाटन, करण्यात व्यस्त होते का❓गडचिरोली जिल्ह्यातील भाजपाचे आमदार डॉ. देवराव होळी विज बिल आणि अन्य समस्या घेऊन राज्यात २४/२/२०२१ पासून जेलभरो आंदोलन करणार होते. परंतु शासनाच्या कोरोना प्रतिबंधात्मक आदेशामुळे स्थगित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. होळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील अनेक ठिकाणी आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजनाचे प्रश्न, वेतनातील तफावतीच्या समस्या, समान काम.. समान वेतनाचा निर्णय, शेतकऱ्यांच्या खानाला हमीभाव.नुकसान भरपाई,कृषीपंपाच्या विज बिल विषयक समस्या,बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या , खाजगीकरण, २००५ नंतर शासकीय, निमशासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांचे पेंशन, राज्य महामार्गावरील खड्डे, शहरातील अंतर्गत रस्ते, MIDC च्या समस्या आणि त्या मध्ये उभे करावयाचे उद्योग, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसाय आणि उद्योगासाठी कर्ज,,आयुष्यमान भारत, म. फुले जन आरोग्य योजनांच्या समस्या, बॅकांची उदासीनता, आपल्या राजकीय पक्षाचे सरकारच्या कारकिर्दीत बोकाळलेला भ्रष्टाचार आणि लुटमार, आर्थिक घोटाळेबाजी यासारख्या अनेकविध समस्या आजही गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात आवासून उभ्या असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा पासून डॉ. होळी साहेब कुठे❓ होत्या.?? हा माझा वैयक्तिक प्रश्न नाही तर उभ्या असलेल्या या संदर्भातील अनेक समस्या सर्व जनतेच्या आहेत. डॉ. होळी साहेब… केवळ जेलभरो आंदोलन सुरू केली म्हणून या संदर्भात असलेल्या समस्या सुटणार नाही तर प्रत्यक्षपणे आपल्या पक्षाचे सरकार असतांना या सर्व बाबींकडे पराकोटीने लक्ष वेधले असते तर राज्यातील अवस्था सुधारली असती. हे आपण नाकारु शकत नाही.. आजही देशाच्या कानाकोपऱ्यात शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्या अनुषंगाने आंदोलने सुरू आहेत.

शेती म्हणजे काय असतं, हे शेतीत राबल्याशिवाय, शेतीसाठी पैशांची जमवा-जमव केल्याशिवाय कळतं नाही, शेतीत काम करून आलेला बाप, जेव्हा हातापायाची हाडं दुखवत, रात्रीचा कन्हत उठून बसतो, त्याच्या पोराला आणि त्या बापाला विचारा शेती म्हणजे काय असते?? आणि काय अडचणी येतात.ते अनुभवून पहा..

शेतकऱ्यांना लुबाडणारे राजकीय दलालही म्हणतील शेतकरी नाडला जातो, आणि शेतकरी नाडला जात नाही असं म्हणणाऱ्यांना काय म्हणावं, मुळात शेती हा विषय इंग्रजी पुस्तक मराठीत भाषांतरीत करण्यासारखा साधा सोपा वाटतो का❓❓ कुंथत कुंथत स्टेजवरचे पोकळ भाषणाचे रकाने भरण्या सारखाही शेतीचा विषय सोपा नाही.

शेती कोणताही राजकीय पक्ष, संघटनेच्या विचारांचं गुलाम राहून, त्यांची वेळोवेळी दलाली करून करता येत नाही. शेतीत शेतमजूर, अल्पभूधारक, जास्त जमीन असलेले शेतकरी असा भेदभाव करता येत नाही.पाऊस पडला तर सर्वांच्या शेतात, गारपीट, ऊन, पिकांवरील रोग सर्वांच्याच शेतात येतात, राजकीय पक्षांची दलाली करण्यासाठी इथे हिंदू-मुस्लिम, मराठा-माळी असा भेद करून शेतीचं दुकान चालवता येत नाही, शेतीत राबतांना मानेपासून माकडहाडापर्यंत घाम वाहत येतो, तेव्हा शेती फुलते, एवढं करूनही निसर्गाने साथ दिली नाही, तर शेतकरी डोळ्यात अश्रू आणणारच, त्याला अधिकार नाही का तेवढा ही?

शेतकरी काही टीव्हीवर दिसण्यासाठी चमकोगिरी करत नाही, कारण तुम्हाला आमंत्रण पाठवलंय का शेतकऱ्यांनी, आम्ही रडतोय दाखवा आम्हाला टीव्हीवर, आमचा फोटो पेपरवर लावा म्हणून???

शेतकरी निसर्ग वागेल तशी गणितं आखतो जगण्यासाठी, कुणाचं सरकार, कुणावर दबाव आणायचा, हे गणित राजकीय पक्ष, नेते आखतात, बड्या धेंडांची, मंत्र्यांची खोटी-खोटी शाबासकी मिळवण्यासाठी. यासाठी तुम्ही वेळोवेळी शेतकऱ्यांच्या दु:खाचं भांडवलं केलं, तेव्हा त्याला विचारलं होतं का? ‘
शेतकरी कष्टाने शेती करतो, नुकसान सहन करण्याची ताकदही त्यांच्यात आहे, पण तो आपल्यासारखी दलाली करू शकत नाही. एवढीच त्याची चूक आहे.??

आंबा भरपूर येणार आहे, डाळिंबे छानच झाली आहेत वा द्राक्षे मुबलक येणार आहेत, या वाक्यांवरून तुमचा पाय शेतीला लागलेला दिसत नाही, भरपूर आंबा येणार यापेक्षा आंब्याला चांगला मोहोर आलाय, डाळिंबाची फलधारणा यंदा चांगली झालीय, फळांचा आकार एक सारखा आहे, असं शेतकरी म्हणत असतो.

‘डाळिंबे छानच झाली आहेत’, असं म्हणायला काय तो वरण भात आहे?, ‘आंबा भरपूर येणार आहे’, असं म्हणायला तो काय दिवाळी बोनस आहे का?, ‘द्राक्षे मुबलक येणार आहेत’, असं म्हणायला ते काय पीएफ वरचं व्याज आहे का?

नगदी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी किती कर्ज काढून शेती फुलवली, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी किती फळबागा फुलवल्या, तिथे धनदांडगा हा शब्द शेतकऱ्यांना आला कुठून?, शेतकऱ्यांनी फळबागांना जी औषधं दिली, त्याची उधारी किती आहे, हे तुम्हाला कृषी केंद्रावर जाऊन कळेल, ते नुकसान झालेल्या फळबागांवर दिसणार नाही.

शेतकऱ्यांनी एवढी वर्ष कमावलेलं कुठं टाकलं हे विचारतांना, किती अडचणींचा त्याने सामना केला, मुलांना त्याने काय शिकवलं, मुलीचं लग्न केलं का नाही, केलं तर खर्च केला असेलच ना? केला असेल त्याच्या ऐपतीप्रमाणे, आपल्यासारखं अंगूर रबडीचं जेवण देता आलं नसेल त्याला. तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नात पाहुणमंडळीला आईस्क्रिम खायला देता, पण धनदांडगा आणि खोटारडा म्हणून शेतकऱ्याच्या इज्जतीचा फालुदा का करता?

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, असं म्हणणाऱ्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायला हवं? कारण २००७ साली झालेल्या कर्जमाफीच्या प्रकरणांची छाननी करा, स्वत:ला तुम्ही बडे लिडर म्हणून मिरवून घेतात, म्हणून हा कधीतरी थोडासा अभ्यास करा, ??असा शेतकरी दाखवा ज्याला १०० टक्के कर्जमाफी झालीय. जी कर्जमाफी झालीच नाही, त्याचं कौतुक त्याला काय सांगताय, आणि तीही काही शेतकऱ्यांनी मागितली नव्हती, आणि थोडी थोडकी दिली असेल तर ती काय आमदार – खासदार, मंत्र्यांच्या पगारातून मिळाली.??आमच्या सारखं शेतीत जाऊन पाहा, अभ्यास करा आणि मग बोला??
कारण एकीकडे भारत हा शेतीप्रधान देश आहे असं म्हणतांना बळीराजा’, ‘काळीआई’ ही बिरूदं तुम्ही मिरवली, कारण राजकारण्यांना दाखवायचं असतं, आमच्याकडे किती शब्दसंपदा आहे, त्यासाठीही त्याचा वापर केला. तो तुमचा धंदाच आहे, मतांसाठी लाचारी पोटभरायचा.??शेतकरी किती प्रमाणात पिकं कर्ज घेतात, वर्षभराच्या आत किती भरणा करतात, बँकांना याचा किती फायदा होतो, अर्थव्यवस्थेला याचा किती फायदा-तोटा आहे, हे देखिल तपासून पाहा. उलट उद्योजकांना किती दीर्घकालीन कर्ज दिलं जातं, ते किती परत फेड करतात हे देखिल पाहा.

अगदी भारतात बँकिंग क्षेत्राचा विकास होत असतांना राष्ट्रीयकृत बँकांना कुणी मजबूत केलं त्याचाही अभ्यास करा, तेव्हा कृषिक्षेत्र नव्हतं का?, शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी काय काय त्रास घ्यावा लागतो हे देखिल तपासून पाहा.?? नाही का जमत??? मृगनक्षत्राचा पाऊस आला, जमीनीचा सुगंध डोक्यात भरल्यावर शेतकरी पेरता होतो, वेळेवर पेरायला हवं हेच त्याच्या डोक्यात असतं, मग त्यासाठी वाटेल ते तो करतो, कुठूनही पैसा उभा करतो, तो काळ्या मातीला आई म्हणत असेल तर त्याचं काय चुकलं, तो दगडाला देव तर म्हणत नाही ना.?? शेतकऱ्याकडे चार पैसे खुळखुळत असतील तर ते कुबेराचं देणं नाही, ते कष्टाचं देणं आहे. शेतकरी आमचा बाप आहे, आणि शेतकऱ्यावर अन्यायाचे आसूड ओढणाऱ्यिसमोर खरी परिस्थिती ठेवण्याचं आमचं काम आहे, म्हणून अभ्यास न करता आरडाओरड करून पोकळ भाषणे देणाऱ्यांसाठी हा प्रथमोपचार. …..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *