अवैद्यरित्या दारू विक्री करणा-या आरोपीस अटक देशी दारूच्या ४६ निपा, २ दुचाकी सह १,११,४६० रूपयाचा मुद्देमाल जप्त.

*नागपूर* कन्हान : – आपल्या राहत्या घरी अवैद्यरित्या दारू विक्री करणा-या आरोपीस कन्हान पोलीसानी गुप्त माहीतीच्या आधारे छापा मारून अटक करून त्याच्या ताब्यातील ४६ नीपा दारू दोन दुचाकी सह १ लाख ११ हजार ४६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सोमवार (दि.५) एप्रिल ला कन्हान पोलीसाना मिळालेल्या विश्वसनिय गुप्त माहिती नुसार कन्हान थानेदार सुजितकुमार श्रीरसागर (परी.पो.उप अधिक्ष क) यांच्या मार्गदर्शनात छापा मारून आरोपी सोनु रामविलास सिंग वय २४ वर्ष रा. मरगटट्री खदान नं.३ कन्हान हा आपल्या राहते घरी अवैद्यरित्या देशी दारू ४१४० मिली किमत १६१० रूपयाची विक्री करताना मिळुन आला. घटनास्थळावरून देशी दारू ४६ निपा ९० मिली किमत १६१० रू. देशी दारू विक्रीची रोख ६७५० रूपये २ मोटारसायकल व इतर साहित्य असा एकुण १,११,४६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त क रून सरकार तर्फे सपोनि सतिश मेश्राम पोस्टे कन्हान यांचे फिर्यादीने आरोपी सोनु रामविलास सिंग विरूध्द कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून कारवाही करण्यात आली. सदर ची कार्यवाही नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक राकेश ओला, पोलीस अपर अधिक्षक राहुल माकणीकर, पो लीस उपविभागीय अधिकारी कन्हान मुख्तार बागवान यांचे मार्गदर्शनात परीवेक्षाधिन पोलीस उप अधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार श्रीरसागर , सपोनि सतिश मेश्राम, सपोनि अमितकुमार आत्राम, पोशि शरद गिते, सुधीर चव्हाण, संजय बरोदिया, आतिश मानवटकर, जितेंद्र गावंडे सह पोलीस कर्मचा-यांनी कामगीरी यशस्वीरित्या पार पाडली.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9158239147