लाभार्थींनी लसीकरणाचा १००%लाभ घ्यावा. स्वप्निल व्यास कोंढाळी ११८७तर दुधाळा-४९लाभार्थी शिल्लक
Summary
-प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे जागतिक महामारी कोविड १९च्या संक्रमणावर मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार चे वतीनी लसीकरण अभियान चालविले आहे. या लसीकरनाचा सध्या ४५व त्या पेक्षा अधिक वयोगटाचे नागरिकांना लसीकरण देणे सुरू आहे. कोंढाळी येथे ३९२४लाभार्थी असुन१९मे पर्यंत२६१२लाभार्थींनी लसीकरणाचा लाभ घेतला […]
-प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे
जागतिक महामारी कोविड १९च्या संक्रमणावर मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार चे वतीनी लसीकरण अभियान चालविले आहे. या लसीकरनाचा सध्या ४५व त्या पेक्षा अधिक वयोगटाचे नागरिकांना लसीकरण देणे सुरू आहे. कोंढाळी येथे ३९२४लाभार्थी असुन१९मे पर्यंत२६१२लाभार्थींनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.आता १३१२लाभार्थी शिल्लक राहिले असून या पैकी१०८लाभार्थीं ८०वर्षापेक्षा ज्यात वय दुर्धर आजारी आहेत तर ०२लाभार्थी स्थलांतरीत तर१५कोविड संक्रमित असल्याची माहीती ग्रामविकास अधिकारी दिलिप सिंह राठोड यांनी काटोल पं स चे संवर्ग अधिकारी संजय पाटील यांचे कडे पाठविली आहे.
या माहीती चे आधारे संवर्ग अधिकारी संजय पाटील यांनी कोंढाळी येथील १३१२लाभार्थी पैकी ११८७लाभार्थींनी लाभ घ्यावा असे आवाहन केलेआहे. कोंढाळी गावांचे १००टक्के लसीकरन व्हावे या करीता शनिचरा(२८८),ठवळेपुरा (९९),लेंडीपुरा (१२९),रामनगर (९७),हेटीपुरा(८२),सायखोड (७९),विकास नगर(१८३),टिचर काॅलनी-(९३),वडरपुरा (५२),उमाठेनगर (८३) लाभार्थींनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच केशवराव धुर्वे, उपसरपंच स्वप्निल व्यास व सर्व सदस्यानी ही केले आहे.
*दुधाळा येथे-(४९)लाभार्थी शिल्लक असुन या सर्व लाभार्थीनी ही लाभ घ्यावा असे आवाहन दुधाळा सरपंच नीलिमा सरोदे, उपसरपंच, –व सर्व ग्रा प सदस्यांनी केले आहे.
