BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

सावधान ! महाराष्ट्र थांबणार… दिवाळीनंतर महाराष्ट्र जागेवरच थांबणार !!! अल निनोचा विळखा, १९७२ पेक्षा भयंकर दुष्काळ दारात – ही चेतावणी नाही, तर काळाची हाक आहे

Summary

मित्रांनो, दिवाळीचे दिवस जवळ आले आहेत, पण या दिवाळीनंतर एक काळाकुट्ट अंधार दाटून येतोय. ही दिवाळी आपण आनंदात साजरी करू, पण त्यानंतरचा प्रत्येक दिवस संकटाचा आणि अडचणीचा असणार आहे, हे लक्षात ठेवा. दिवाळीनंतर महाराष्ट्राची चाके थांबणार आहेत. मी तुम्हाला घाबरवत […]

मित्रांनो, दिवाळीचे दिवस जवळ आले आहेत, पण या दिवाळीनंतर एक काळाकुट्ट अंधार दाटून येतोय. ही दिवाळी आपण आनंदात साजरी करू, पण त्यानंतरचा प्रत्येक दिवस संकटाचा आणि अडचणीचा असणार आहे, हे लक्षात ठेवा. दिवाळीनंतर महाराष्ट्राची चाके थांबणार आहेत. मी तुम्हाला घाबरवत नाहीये, तर जागे करतोय. कारण अल निनोच्या कोरड्या दुष्काळाचे हे संकट छोटे नाही, ते अफाट आहे. आणि आपल्या लोकांच्या हे अजूनही लक्षात येत नाही, हेच आपले दुर्दैव आहे. दुष्काळाची शिदोरी बांधण्याऐवजी, घरात धान्य-किराणा साठा भरण्याऐवजी आपण सण-उत्सवात, चैनीच्या वस्तू, वायफळ खर्च, फटाके खरेदी आणि डीजे, साऊंड, लेझर लाईटच्या धांगडधिंग्यात रमलो आहोत. किती वाईट आणि लाजिरवाणे हे जगणे आहे. अल निनोच्या महाभयंकर संकटाला तुम्ही हलक्यात घेत आहात, हेच दुर्दैव आहे. म्हणून आज मी थेट, रोखठोक आणि काळजाला घरं पाडणारे सत्य मांडतोय.

ज्यांनी १९७२ चा दुष्काळ पाहिला आहे, त्यांच्या अंगावर आजही काटा येतो. आईने पोटच्या गोळ्याला विकल्याच्या, पाण्यासाठी माणसांनी वणवण भटकल्याच्या, जनावरांनी तडफडून प्राण सोडल्याच्या कहाण्या आपण ऐकल्या. पण मित्रांनो, यंदाचा दुष्काळ त्या १९७२ पेक्षाही कितीतरी पटीने भयंकर असणार आहे.

१९७२ ला निदान पाऊस अधून-मधून हजेरी लावत होता. यावेळी परिस्थिती वेगळी आहे. पावसाळ्याच्या चारही महिन्यांनी आपल्याला धोका दिला. हा ओला दुष्काळ नाही, हा निखळ कोरडा दुष्काळ आहे. नक्षत्रं कोरडी गेली. पेरण्या झाल्या, पण बियाणं मातीतच जळून गेलं. जमिनीत ओलावा नाही. विहिरींनी तळ गाठला आहे, बोअरवेल कोरड्या ठाक पडल्या आहेत आणि मोठमोठ्या धरणात केवळ गाळ आणि भेगा उरल्या आहेत. हे निसर्गाचे चक्र नाही, हा अल निनोचा थेट घाला आहे. प्रशांत महासागरात वाढलेल्या तापमानाने आपला मान्सूनच पळवून नेला आहे. हवामान तज्ज्ञ ओरडून सांगत होते, पण आपण सण-उत्सवात मश्गुल होतो.

आता या दुष्काळाची साखळी कशी एकमेकांना विळखा घालणार आहे, ते समजून घ्या.

१. पाणी टंचाईचा पहिला तडाखा :* राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील धरणे आता पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आली आहेत. गावागावात शासनाने पाणी पुरवठ्यात कपात केली आहे. अनेक ठिकाणी आजपासूनच टँकरने पाणीपुरवठा सुरु झाला आहे. दिवाळीनंतर हेच चित्र शहरात दिसणार आहे. नळाला थेंबही येणार नाही. एका हंडाभर पाण्यासाठी महिला भगिनींना रात्र-रात्र जागून काढावी लागेल. पाण्यावरून वाद, भांडणे आणि हाणामाऱ्या होतील. कारण पाणी म्हणजे जीवन, आणि तेच जीवन आपल्या हातातून निसटत चालले आहे.

२. रोजगारावर दुसरा घाला : अल निनोच्या दुष्काळाने रोजगारावर घाला घातला आहे. शेतात पीकच नाही, तर शेतमजुराला काम कोण देणार? शेतात मजूर नाहीत तर शेतमजूर जाणार कुठे? लाखो हात बेरोजगार होणार आहेत. रोजंदारीवर पोट भरणारा वर्ग उघड्यावर येणार आहे. शहरात पाणी नसल्याने बांधकामे बंद पडतील. कंपन्यांचे उत्पादन घटेल. गावात काम नाही म्हणून तरुण शहरात धाव घेतील आणि शहरातही काम मिळणार नाही. ही अशी दुहेरी कोंडी आहे, जी संपूर्ण पिढीला नैराश्याच्या खाईत लोटेल.

३. अन्न टंचाई आणि महागाईचा तिसरा महास्फोट : दुष्काळामुळे अन्न टंचाई आणि महागाई अगडबंब वाढणार हे स्पष्ट आहे. आजच डाळी व कडधान्याचे भाव वाढले आहेत. शेतात धान्य नाही, तर बाजारात येणार कोठून? अन्न-धान्याची मागणी तेवढीच, पण पुरवठा शून्य. याचा सरळ अर्थ आहे – महागाईचा स्फोट. जी तूरडाळ आज १५० ते २०० रुपयांना आहे, ती उद्या ३५० रुपये होईल. तेल, साखर, भाजीपाला सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाईल. अशी वेळ येईल की खिशात पैसा असेल, पण दुकानात धान्य नसेल. लक्षात ठेवा, दुष्काळात पैशाची किंमत शून्य असते, किंमत असते ती फक्त भाकरीला.

म्हणूनच हात जोडून विनंती – चैन थांबवा, बचत करा

म्हणूनच मी तुम्हाला कळकळीने सांगतोय, या दिवाळीत वायफळ खर्चाला पूर्ण लगाम घाला. सण साजरा करा, पण दिखावा नको. या वर्षी चैनीच्या वस्तू – महागडा मोबाईल, मोठा टीव्ही, नवीन फ्रीज, कुलर घेण्याची अजिबात गरज नाही. नवीन कपड्यांची हौस बाजूला ठेवा, आहे त्याच कपड्यात दिवाळी साजरी होते. घराची रंगरंगोटी यंदा नाही केली तरी चालेल. तीर्थयात्रा, सहल, हॉटेलमधील पार्ट्या, बाहेरचे महागडे जेवण यावर अंकुश लावा. वाचवलेला प्रत्येक रुपया हा पुढचे आठ महिने तुमच्या कुटुंबाचा प्राण वाचवेल.

प्रत्येक कुटुंबप्रमुखाने आजच एक निर्णय घ्या – पुढचे आठ महिने पुरेल एवढा किराणा आणि धान्य घरात भरून ठेवा. गहू, ज्वारी, तांदूळ, डाळ, तेल, मीठ, साखर. जे टिकाऊ आहे ते आजच घेऊन ठेवा. हे मी तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर काळाची पावले ओळखून सांगतोय. आज बाजारात वस्तू आहेत, उद्या पैसा असूनही मिळणार नाहीत.

आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, या काळात माणूस होऊन जगू या

आपल्या अवतीभवती असे अनेक बांधव आहेत ज्यांच्याकडे साठवणूक करायलाही पैसे नाहीत. गोरगरीब, वयोवृद्ध आई-बाप, निराधार महिला, दिव्यांग बांधव. त्यांच्याकडे कोण पाहणार? शासनाची मदत येईल तेव्हा येईल, पण तोवर आपणच एकमेकांचा आधार होऊया. तुमच्या घरात चार भाकरी असतील तर दोन भुकेल्या मुखाला द्या. तुमच्या घागरीत पाणी असेल तर तहानलेल्याला पाणी पाजा. तुम्ही पाजलेल्या पाण्यातून आणि भरवलेल्या घासातून मिळणारे आशीर्वादच आपल्याला या भयंकर दुष्काळातून वाचवतील. लक्षात ठेवा, दुष्काळ हा केवळ पावसाचा नसतो, तो माणुसकीचा सुद्धा असतो, तो आपण पडू देऊ नका.

या भयंकर दिवसात दानशूर व्यक्ती, व्यापारी, उद्योगपती, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपल्या गावात, धर्मादाय संस्था सभागृहात, ग्रामपंचायत सभागृहात, स्थानिक श्री हनुमान मंदिर, श्री जगदंबा मंदिर किंवा संत गजानन महाराज मंदिरात दुष्काळाचे दिवस निघून जाईपर्यंत सात-आठ महिने दररोज सदावर्त अन्नछत्र सुरु करून आपल्या गावातील गोरगरीब, मजूर, शेतमजूर, वयोवृद्ध, दिव्यांग, निराधारांची दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करावी. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई, गुरे-ढोरे जनावरांसाठी पाण्याचे हौद बांधावेत. आजारी व्यक्तीसाठी मोफत उपचाराची व्यवस्था करावी.

मित्रांनो, घाबरायचं नाही, पण डोळे झाकूनही चालणार नाही. ही वेळ रडत बसण्याची नाही, तर लढण्याची आहे. दिवाळीचा आनंद घ्या, पण उद्याच्या कठीण दिवसाची तयारी आजच करा.

सावध व्हा… सतर्क रहा… बचत करा… आणि माणुसकी जपा….!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *