क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

मध्यरात्री रेतीचोरीवर मोहाडी पोलिसांची कारवाई; ६ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

Summary

मोहाडी : वैनगंगा परिसरात अवैध रेतीउत्खननाविरोधात सुरू असलेल्या कारवाईत मोहाडी पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत एक ट्रॅक्टर-ट्रॉलीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२.४० वाजताच्या सुमारास ग्राम मौजा हरदोली (१० किमी पश्चिम) येथे पोलीस नाईक […]

मोहाडी : वैनगंगा परिसरात अवैध रेतीउत्खननाविरोधात सुरू असलेल्या कारवाईत मोहाडी पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत एक ट्रॅक्टर-ट्रॉलीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२.४० वाजताच्या सुमारास ग्राम मौजा हरदोली (१० किमी पश्चिम) येथे पोलीस नाईक बाळकृष्ण अशोक पाठक (ब.नं. १२४६), पोलीस स्टेशन मोहाडी हे पोलीस पथकासह पेट्रोलिंग करत असताना ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांना संशयास्पद हालचाल दिसून आल्याने तपासणी केली असता आरोपी चालक-मालक बादल रामदास नागपुरे (वय २७ वर्षे, रा. खमारी बु., ता. मोहाडी, जि. भंडारा) हा निळ्या-पांढऱ्या रंगाचा स्वराज ७३५ जीडी कंपनीचा विनाक्रमांक ट्रॅक्टर व त्यास जोडलेली विनाक्रमांक ट्रॉलीद्वारे रेतीची अवैध वाहतूक करताना आढळून आला.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल :
स्वराज ७३५ जीडी ट्रॅक्टर (इंजिन व चेसीस क्रमांकासह) – अंदाजे किंमत ₹५,००,०००
विनाक्रमांक ट्रॉली – अंदाजे किंमत ₹१,००,०००
०१ ब्रास रेती – अंदाजे किंमत ₹६,०००
लोखंडी फावडा – ₹५०
प्लास्टिक घमेला – ₹५०
असा एकूण सुमारे ₹६,०६,१०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन मोहाडी येथे अप.क्र. ५७/२०२६ अंतर्गत कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता, सहकलम ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ७, ९ आणि ५०/१७७ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार भोंगाडे (ब.नं. ७७३), पो.स्टे. मोहाडी हे करीत आहेत.
अवैध रेती वाहतुकीविरोधातील ही कारवाई मोहाडी पोलिसांच्या सतर्कतेचे द्योतक मानली जात असून, परिसरात रेतीमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *