चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

संभाजी भिडेच्या निषेधार्थ वंचित चे कार्यकर्ते आक्रमक पोलिसांकडून वंचितच्या कार्यकर्त्यांना अटक

Summary

          संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी समूहाचे अशास्थान असणाऱ्यां भीमा कोरेगाव या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखो अनुयायी उपस्थित असतांना त्याठिकाणी दंगल घडवीणारा संभाजी भिडे आज दिनांक 23 जुलै रोजी चंद्रपूर शहरात आला असता वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा […]

          संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी समूहाचे अशास्थान असणाऱ्यां भीमा कोरेगाव या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखो अनुयायी उपस्थित असतांना त्याठिकाणी दंगल घडवीणारा संभाजी भिडे आज दिनांक 23 जुलै रोजी चंद्रपूर शहरात आला असता वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा कार्याध्यक्ष जयदीप खोब्रागडे यांच्या नेतृत्वात संभाजी भिडे यांचा निषेध करण्यात आला. त्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
या देशाचे संविधान मान्य नाही, या देशाचा राष्ट्रध्वज मान्य नाही असे वक्तव्य करून सुद्धा पोलीस प्रशासन त्याच्यावर कुठलाच गुन्हा दाखल करत नाही. उलट त्याला पोलीस सहकार्य करते. सामान्य माणसाने एखादी चूक केली तर त्याच्यावर गुन्हा दाखल केल्या जातो. मात्र देशविरोधी वक्तव्य करून सुद्धा संभाजी भिडेवर कोणताच गुन्हा दाखल करण्यात येत नाही. सरकारची ही भूमिका जातीवादी असून महाराष्ट्र सरकारचा निषेधही यावेळी करण्यात आला. अश्या जातीवादी वृत्तीच्या गृहमंत्र्याने राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
यावेळी जिल्हा महासचिव मधुकर उराडे, जिल्हा उपाध्यक्ष कपुरदास, दुपारे,विजु इंगोले, राहुल चौधरी,शहर अध्यक्ष बंडू ठेंगरे, शहर कार्याध्यक्ष सतिश खोब्रागडे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष कविताताई गौरकार,शहर महिला आघाडी अध्यक्ष तनुजाताई रायपूरे, शहर महिला महासचिव मोनाली पाटील, महिला तालुकाध्यक्ष संध्याताई पेटकर, लताताई भीमलाल साव,सुलभा बंडूजी चांदेकर
इंदूताई डोंगर,संघमित्रा मावलीकर,चंद्रप्रभा रामटेके,
ललिता दुर्गे,ललिता गेडाम,
इंदिरा खोब्रागडे,तृप्ती उराडे,
शोभा नरवाडे,किरण खैरकार,
ज्योती उंदीरवाडे,विद्या टेभरे,पुष्पलता कोटांगले, अविंता उके,शालू कांबळे,
दमयंती तेलेंग,रिचाताई लोणारे,वैशाली साव,जिल्हा युवा महासचिव विशेष निमगडे, युवा शहर महासचिव हर्षवर्धन कोठारकर,IT प्रमुख नकुल कांबळे,अश्विन मणिक शेंडे,प्रदीप दिगंबर झामरे, गौतम दयाल रामटेके,सुदेश प्रमोद शिंगाड़े, परिष नानाजी नगराडे,पृथ्वीराज नीलकंठ गायकवाड़, रोहन जयंत कळसकर, असित सूर्यवंशी, अरविंद घडले, संतोष ठाकरे,
या सर्वाना अटक करण्यात आली.
संविधान विरोधी संभाजी भिडे विरोधात वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर च्या वतीने निदर्शने करण्यात आली. पोलीस प्रशासनाने आंदोलन करणाऱ्या वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाने अटक केली.
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *