महाराष्ट्र मुंबई रोजगार हेडलाइन

अग्निपथ योजनेबद्दल जनजागृती करणाऱ्या चित्रपटाचा मुहूर्त राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

Summary

मुंबई, दि. 22 : केंद्र शासनाच्या अग्निपथ योजनेबद्दल युवकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने तयार होत असलेल्या ‘भारत के अग्निवीर’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा तसेच पोस्टरचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. हा चित्रपट विविध भारतीय भाषांमध्ये […]

मुंबई, दि. 22 : केंद्र शासनाच्या अग्निपथ योजनेबद्दल युवकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने तयार होत असलेल्या ‘भारत के अग्निवीर’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा तसेच पोस्टरचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. हा चित्रपट विविध भारतीय भाषांमध्ये तयार करण्यात येणार आहे.

महंत रवींद्र पुरी क्रिएशन्स व सत्य ऑनलाईन प्रॉडक्शनद्वारे तयार होत असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टर प्रकाशन सोहळ्याला अध्यात्मिक गुरु डॉ राजेंद्र महाराज (अमृतवाणी सत्संग), निरंजनी आखाड्याचे महंत केशव पुरी, चित्रपटाचे निर्माते पुरुषोत्तम शर्मा व अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेचे प्रवक्ते अविक्षित रमण प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *