रविवारच्या नागरी सेवा परीक्षेसाठी प्रशासनाची तयारी

रविवारच्या नागरी सेवा
परीक्षेसाठी प्रशासनाची तयारी
नागपुर-प्रतिनीधी-:
संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली मार्फत आयोजित नागरी सेवा (पूर्व) पवरिक्षा 5 जून 2022 रोजी नागपूर येथील 47 उपकेंद्रावर सत्र 1 – सकाळी 9.30 ते 11.30 व सत्र 2– दुपारी 2.30 ते 4.30 वाजेपर्यंत आयोजित केलेली आहे. सदर्हु परिक्षेला यावर्षी नागपूर केंद्रावर एकूण 18093 परिक्षार्थी परिक्षा देणार आहेत. सदर्हु परिक्षेचे यशस्वी आयोजनाकरीता सर्व 49 उपकेंद्रावर/सहाय्यक पर्यवेक्षक/ समवेक्षक/ लिपीक असे एकूण 900 अधिकारी/ कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याशिवाय संघ लोकसेवा आयोगाचे निदर्शनेनुसार परिक्षा सुरळीत पार पाडण्याकरीता प्रत्येक उपकेंद्रवर 1 स्थानिक निरिक्षण आधिकारी, असे एकूण 49 स्थानिक निरक्षण आधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
नागपूर सेवा (पूर्व) परिक्षा -2022 करीता संघ लोसेवा आयोगाद्वारे काही विशिष्ट बदल करण्यात आलेले आहेत, त्यानुसार परिक्षार्थींना परिक्षा केंद्रावर प्रवेश हा प्रथम संत्राकरीता सकाळी 9.20 वाजेपर्यंत, द्वितीय संत्राकरीता दुपारी 2.20 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. त्यांनतर कोणत्याही परिक्षार्थीस परिक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच परिक्षार्थी यांना आयोगाने नेमून दिलेल्या परिक्षा केंद्रावर परिक्षा देता येणार आहे. या बदलाबात परिक्षार्थींनी नोंद घेऊन त्यांना नेमून दिलेल्या परिक्षा केंद्रावर व नियोजित वेळेतच परिक्षार्थी उपस्थित राहतील याबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.
परिक्षार्थीस प्राप्त झालेल्या परिक्षेच्या प्रवेश पत्रावरील माहिती काळजीपुर्वक वाचून सर्व सूचनांचे परिक्षार्थीने काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी यांनी सूचित केले आहे. परिक्षार्थीस परिक्षा केंद्रावर सकाळचे संत्राकरीता सकाळी 9.20 नंतर व दुपारचे सत्राकरीता दुपारी 2.20 नंतर प्रवेश देण्यात येणार नसल्याने परिक्षार्थीने याबाबत स्वता:चे स्तरावर विशेष काळजी घेऊन आयोगाने दिलेले वेळेचे बंधन कटाक्षाने पाळावयाचे असल्याने विशेष काळाजी घेण्याचे आवाहन केले आहे. याबाबत विशेष दक्षता परिक्षार्थी घ्यावयाची असल्याचे निर्देश दिलेले आहेत.
परिक्षार्थी यांनी परिक्षा केंद्रावर प्रवेशपत्र, ओळखपत्र, काळा बॉल पॉइंट पेन तसेच आयोगाने परवानगी दिलेल्या साहीत्य व्यतिरिक्त इतर कोणतेही साहित्य म्हणजे कॅलक्युलेटर, मोबाईल फोन, डिजीटल वॉच, ब्लुटुथ, आय-पॅड, आय.टी.गॅजेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधने परिक्षा केंद्रामध्ये आत नेण्यास मनाई आहे, याची नोंद घ्यावी. परिक्षा सुरळीत, शांततेत पार पाडण्यास उमेदवारांनी सहकार्य करावे.