दुभाजकाला ऑटोची धडक, ऑटो पलटुन महिले चा मुत्यु तर चार जख्मी
कन्हान : – सामानाची खरेदी करून एक कुंटुब ऑटो ने घरी परत जाताना चालकाने ऑटो निष्काळजीने चालवुन रस्ता दुभाजकाला धडक मारल्याने ऑटो पल टुन झालेल्या अपघातात एका महिलेचा मुत्यु झाला तर चार जण जख्मी झाले. ही घटना कांद्री येथील जय दुर्गा मंगल कार्यालय समोर घडली.
भगवानदेवी लखनसिंग गुजर असे मृत महिलेचे नाव आहे. तर देवीदास लखनसिंग गुजर, मायादेवी कुमारी गुजर, कान्हा व सुधीर अशी जख्मीची नावे आहेत. रविवार (दि.५) ला देवीदास गुजर हे त्यांची आई भगवानदेवी , पत्नी मायादेवी आणि पुतण्या कान्हा यांच्या सोबत ऑटो क्र एमएच ४० एआर १६२० ने सामान खरेदी गेले व दुपारी १ वाजता सामान घेऊन त्याच ऑटोने घरी परत येताना ऑटो चालक सुधिर ने आपले वाहन चुकीच्या पध्दतीने व निष्काळजीने चालवुन नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामा र्गावरील जय दुर्गा मंगल कार्यालय कांद्री सामोर रस्ता दुभाजकाला धडक मारल्याने ऑटो पलटुन अपघात झाला. यात भगवानदेवी गुजर यांचा घटनास्थळीच मुत्यु झाला तर देवीदास गुजर, मायादेवी गुजर आणि कान्हा तसेच आरोपी सुधिर जख्मी झाले. त्याना तात डीने कामठी येथील सैन्य दलाच्या रूग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणी कन्हान पोलीसानी आरो पी ऑटो चालका विरू़ध्द कलम २७९, ३३८, ३०४ (अ) आणि मोवाका १८४ अन्वये गुन्हा दाखल केला असुन कन्हान पोस्टे चे पोलीस उपनिरिक्षक जावेद शेख पुढील तपास करित आहेत.
