महाराष्ट्र हेडलाइन

*56 तलाठी कार्यालयाच्या बांधकामास मंजुरी मिळवणारा सिल्लोड – सोयगाव ठरला राज्यातील पहिला मतदार संघ !* *राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर मिळाली सतरा कोटींच्या निधीला मंजुरी* – *सिल्लोड सोयगाव तालुक्यातील 56 तलाठ्यांना मिळणार हक्काची जागा !* – *राज्यातील पहिलाच अभिनव उपक्रम* *-तलाठी कार्यालयासह निवासस्थानाला ही मिळाली मंजुरी*

Summary

सिल्लोड (प्रतिनिधी, ता. 8) : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी तलाठी कार्यालयांना जागा नव्हती. या कार्यालयांना हक्काची जागा मिळावी म्हणून राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले […]

सिल्लोड (प्रतिनिधी, ता. 8) : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी तलाठी कार्यालयांना जागा नव्हती. या कार्यालयांना हक्काची जागा मिळावी म्हणून राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. सिल्लोड- सोयगाव तालुक्यातील सुमारे 56 ठिकाणी तलाठी कार्यालय तसेच तलाठ्यांचे निवासस्थान बांधण्यास मंजुरी मिळाली आहे. ही परवानगी मिळवणारा सिल्लोड सोयगाव मतदारसंघ राज्यातील पहिला ठरला आहे. तलाठी कार्यालय आणि त्यांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी सुमारे 17 कोटींच्या निधीला अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेला शब्द पूर्ण केला……

मतदार संघातील तलाठ्यांना कार्यालय आणि त्या ठिकाणी त्यांचे निवासस्थान असले पाहिजे असं राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा मानस होता. त्यासाठी ते अनेक दिवसापासून प्रयत्न करीत होते. अखेर निधी मंजूर झाल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने आणि त्यांनी दिलेला शब्द पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त केले.

जनतेची होणार सुविधा…..

तलाठी अनेक वेळा जागेवर नसल्यामुळे जनतेच्या कामांना विलंब होतो. त्यामुळे त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून तलाठ्यांच्या कार्यालयाजवळ निवासस्थानाच्या बांधकामास मंजुरी मिळवून घेतली आहे. त्यामुळे तलाठी जागेवर उपलब्ध होतील आणि जनतेची कामे वेळेत होतील.

हा उपक्रम ठरेल मैलाचा दगड……

तलाठी कार्यालय जवळ निवासस्थान असावे असा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा मानस होता. त्यामुळे जनतेसाठी सोयीचे होईल. असा त्यांचा उद्देश आहे. त्यांच्या या उपक्रमाला मंजुरी मिळाल्याने तो उपक्रम मैलाचा दगड ठरेल आणि राज्यभरात असा उपक्रम सर्वत्र राबवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही

पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
सिल्लोड प्रतिनिधी
शेख चांद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *