महाराष्ट्राचे प्राचीन शासक नाग लोक आहेत – शेखर मगंर पाटील
Summary
मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. ९ एप्रिल २०२१ नागाचे चित्र आपल्या महाराष्ट्राची स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड वरील आहे. आजच्या ब्राम्हणी इतिहासकारांनी ज्या इतिहासात तथाकथीत रायगडावरील बाजारपेठांचा उल्लेख केला आहे ..त्या पुर्वीच्या बाजार पेठा नसुन त्या शिवाजी महाराजांच्या मंत्री मंडळातील मंत्र्यांची […]
मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. ९ एप्रिल २०२१
नागाचे चित्र आपल्या महाराष्ट्राची स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड वरील आहे. आजच्या ब्राम्हणी इतिहासकारांनी ज्या इतिहासात तथाकथीत रायगडावरील बाजारपेठांचा उल्लेख केला आहे ..त्या पुर्वीच्या बाजार पेठा नसुन त्या शिवाजी महाराजांच्या मंत्री मंडळातील मंत्र्यांची आँफीस होती. ब्राम्हणांनी भविष्याचा विचार करुन खोटा इतिहास लिहीला आहे .ज्या बाजारपेठांचा उल्लेख केला, इतिहासात बाजार पेठांचा उल्लेख केला तर इतिहास बाजार पेठांपुरताच मर्यादीत राहतो. बाजारपेठ म्हटले तर इतिहास तिथेच स्टाँप होतो हेच जर मंत्र्यांची आँफीस होती असा इतिहास लिहिला तर ब्राम्हणांनी भितीने महाराजांचा इतिहास अजुन वाढेल ?? त्याकाळी मंत्र्यांसाठी ऐवढी डबल मजली इमारतीची आँफीस स्वराज्याच कामकाज चालवण्यासाठी बनवली होती तर त्यावरुन शिवाजी महाराजांचा दुरद्रृष्टीकोन आणि स्वराज्याचा केवढा मोठा विस्तार होता हे महाराष्ट्रातील जनतेला कळाले असते म्हणुन शिवरायांच्या मंत्री मंडाळातील मंञ्यांची आँफीस डायव्हटऀ करुन बाजारपेठांमध्ये रूपांतर केल. जानुन भुजून बाजारपेठ हा शब्द प्रयोग केला.त्याच ठिकाणी मिळालेल हे नागाच चित्र आहे.
तुम्ही महाराष्ट्रातील जेवढी जुनी मंदीर आहेत एवन भारतातील जेवढी अतिप्राचीन मंदीर आहेत त्या मंदीरामध्ये जुने मोठे लाकडी दरवाजे आहेत त्या दरवाज्यांवरती सुद्धा नागाच्या फनीचे चित्र कोरलेली आहेत. खंडोबा, बिरोबा, माउलाय, म्हसोबा, शंकर, जोतिबा, जोतिर्लिंग अजुन भरपुर देव आहेत त्यांच्या पाठीमागे कुणाच्या गळ्यात नागाचे चीत्र कोरले आहे दाखवल गेलं आहे. त्या सगळ्या गोष्टींच कारण एकच आहे आपण नागवंशी लोक आहोत. त्यासाठी आपल्या समाजात एक मोठी प्रथा आहे आणि ती प्रथा आपण मोठा सण म्हणुन साजरा करतो, नागपंचमी बहुजन मुलनिवासी नागवंशीय लोकांचा हा सण आहे या दिवशी आपण नागाची पुजा करतो कारण आपण नागवंशी लोक आहोत. रट्ठ आणि महारठ्ठ ही नावे सम्राट अशोकाने दिलेली आहेत , तेच लोक मराठा व महार होय ! दक्षिण भारतातील रेड्डी देखील रट्ठी आहेत! रट्ठी लोकांना राष्ट्रिक असेही म्हटले जाते ! यावरुनच महाराष्ट्र असे नाव पडले आहे ! डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मराठ्यांना नागवंशीय मानत असत . मराठे व महार हे नागवंशीय आहेत याची जाणीव ब्राम्हण वर्गाला आहे म्हणून तो या दोन समूहामध्ये नेहमी झगडे लावून ठेवतो . म्हणून तर पाऊस टक्के ब्राम्हण महाराष्ट्रावर राज्य करीत आहे ! असे विचार शेखर मगर पाटील छत्रपती क्रांती सेना यांनी व्यक्त केले आहे.