🚨 कारधा चौकात महसूल विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! १० चाकी ट्रकमधून रेतीची तस्करी करणाऱ्या नागपूरच्या टोळीवर झडप; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
कारधा (प्रतिनिधी): भंडारा जिल्ह्यात अवैध रेती उपसा आणि तस्करी करणाऱ्यांविरुद्ध आता महसूल विभागाने थेट रस्त्यावर उतरून रणशिंग फुकले आहे. कारधा चौकात उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी संयुक्तपणे केलेल्या एका धाडसी कारवाईत नागपूरकडे रेतीची चोरटी वाहतूक करणारे दोन मोठे ट्रक पकडले. या कारवाईत पोलिसांनी एकूण ३० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
🎬 असा रंगला ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा!
दिनांक १२ फेब्रुवारी रोजी रात्री ७:१५ ते ७:२० च्या सुमारास कारधा चौकात उपविभागीय अधिकारी (SDO) स्वतः वाहनांची तपासणी करत होते. यावेळी एकामागोमाग एक दोन १० चाकी ट्रक संशयास्पद रितीने येताना दिसले. अधिकाऱ्यांनी हात दाखवून ट्रक थांबवले आणि पाहणी केली असता, त्यात विनापरवाना १०-१० ब्रास रेती भरलेली आढळली. ही रेती शासनाची चोरी करून नागपूरच्या बाजारपेठेत नेली जात होती.
⛓️ नागपूरच्या तस्करांच्या पडल्या मुसक्या!
महसूल विभागाने या प्रकरणी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत चार जणांविरुद्ध कारधा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे:
कारवाई १ (अप. क्र. ३९३/२०२६):
ट्रक: MH-40 NS-3026 (किंमत १५ लाख रु.)
आरोपी: चालक आदित्य बोपचे (रा. कांद्री) आणि मालक दीपक हिंगे (रा. कन्हान, जि. नागपूर).
जप्त रेती: १० ब्रास (किंमत ४०,००० रु.)
कारवाई २ (अप. क्र. ३९४/२०२६):
ट्रक: MH-40 BJ-8810 (किंमत १५ लाख रु.)
आरोपी: चालक विक्की मेश्राम (रा. कामठी) आणि मालक महेश वंजारी (रा. नेरी, ता. कामठी).
जप्त रेती: १० ब्रास (किंमत ४०,००० रु.)
⚖️ तहसीलदारांनी स्वतः दिली फिर्याद!
शासनाचा महसूल बुडवून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या या तस्करांविरुद्ध भंडारा तहसीलदार संदीप काशीनाथ माकोडे यांनी स्वतः कारधा पोलीस ठाण्यात हजर राहून तोंडी रिपोर्ट दिला. यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या विविध कठोर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सुभाष राठेड हे अत्यंत वेगाने करत आहेत. या कारवाईमुळे रेती माफियांच्या गोटात मोठी खळबळ माजली असून, जिल्हा प्रशासनाचा हा दणका चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान सुभाष राठोड हवालदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे जप्त मालाची फोटो नसल्याचे सांगितले.
ग्राम महसूल अधिकारी विठ्ठल मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याजवळ जप्त मालाची फोटो नसून विक्रम राठोड, उपविभागीय अधिकारी भंडारा यांच्याकडे असल्याचे सांगितले.
उपविभागीय अधिकारी भंडारा विक्रम राठोड यांच्याशी संपर्क साधला असता जप्त केलेले ट्रक सोडण्यात आले असून माझ्याकडे जप्त केलेल्या मालाची फोटो उपलब्ध नसल्याचे सांगितले.
एफ आय आर ही फक्त कागदोपत्री झाली होती असे ग्राम महसूल अधिकारी विठ्ठल मुंढे यांनी सांगितले.
आरोपींची वाहने दंड भरून सोडण्यात आले असे ग्राम महसूल अधिकारी विठ्ठल मुंढे यांनी सांगितले.
एफ आय आर ही शासन निर्णयाप्रमाणे झाली होती असे उपविभागीय अधिकारी भंडारा विक्रम राठोड यांनी संपादकाशी भ्रमणध्वनीवर बोलतानी सांगितले.
वृत्तसंकलन:
अमर वासनिक
न्यूज एडिटर, पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
संपर्क: ७७७४९८०४९१
