BREAKING NEWS:
चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

नागपूर येथे इन्व्हिटेशनल स्केटिंग स्पर्धेत अधीर जुन्नावारचा प्रथम क्रमांक — गोल्ड मेडल पटकावले!

Summary

महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने इंडियन स्केटिंग अकॅडमी यांच्या वतीने, तसेच नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या भव्य इन्व्हिटेशनल स्केटिंग स्पर्धेला खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. स्पर्धास्थळी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची उपस्थिती होती. लहानग्या खेळाडूंच्या जोशपूर्ण […]

महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने इंडियन स्केटिंग अकॅडमी यांच्या वतीने, तसेच नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या भव्य इन्व्हिटेशनल स्केटिंग स्पर्धेला खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. स्पर्धास्थळी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची उपस्थिती होती. लहानग्या खेळाडूंच्या जोशपूर्ण कामगिरीने आणि वेगवान स्केटिंगने संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण आणि रोमांचक झाले होते.
या स्पर्धेत विविध वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेत आपले कौशल्य दाखविले. विशेषतः ० ते ६ वयोगटात अधीर जुन्नावार याने अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावत गोल्ड मेडल मिळविले. त्याच्या वेग, संतुलन आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
चंद्रपूर शहरात अद्याप अत्याधुनिक स्केटिंग ग्राउंडची सुविधा उपलब्ध नसतानाही येथील खेळाडू मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मोठ्या स्पर्धांमध्ये आपली छाप पाडत आहेत, हे अधीरच्या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. मर्यादित साधनसामग्री असूनही चंद्रपूरमधील खेळाडू कोणत्याही बाबतीत कमी नाहीत, हे या स्पर्धेने सिद्ध करून दाखविले.
या स्पर्धेमुळे लहान वयातच क्रीडाप्रती आवड निर्माण होत असून, खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळत आहे. पालकांनीही आपल्या मुलांच्या सहभागाला मोठ्या उत्साहाने प्रोत्साहन दिले.
अधीर जुन्नावारच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, प्रशिक्षक विनोद निखाडे पालक आणि उपस्थित मान्यवरांनी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

श्री राजकुमार खोब्रागडे
मुख्य संपादक तथा डायरेक्टर
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *