किडणी आजार रुग्णांच्या योग्य उपचारासाठी प्रशिक्षित कर्मचार्यांची नेमणुक करा
Summary
मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये ‘हेमोडायालिसिस टेक्निशियनची’ कायमस्वरूपी पदे निर्माण करावी, अशी मागणी “म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने” चे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) […]
मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये ‘हेमोडायालिसिस टेक्निशियनची’ कायमस्वरूपी पदे निर्माण करावी, अशी मागणी “म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने” चे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) यांच्याकडूनच ‘डायालिसिस टेक्निशियन’ चे काम करून घेतले जाते. मात्र सध्या कंत्राटी पद्धतीने ‘हेमोडायालिसिस टेक्निशियन’ नेमण्यात आले असून, त्यांच्याकडूनच सदर काम करवुन घेतले जात आहे. महानगरपालिका रुग्णालयांमध्ये आजपर्यंत ‘हेमोडायालिसिस टेक्निशियनची’ कोणतीही कायमस्वरूपी पदे निर्माण करण्यात आलेली नाहीत.
इतर महानगरपालिका उदा. मीरा-भाईंदर महानगरपालिका, Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) येथे ‘हेमोडायालिसिस टेक्निशियनची कायमस्वरूपी पदे उपलब्ध केली गेली आहेत. महत्वाचे म्हणजे Directorate of Medical Education and Research (DMER) यांनी सन 2022-23 मध्ये ‘हेमोडायालिसिस टेक्निशियन’ पदांची भरती करून या पदाला मान्यता दिली आहे.
तसेच केंद्र शासनाच्या Indian Railways व All India Institute of Medical Sciences (AIIMS) सारख्या संस्थांमध्ये देखील ‘हेमोडायालिसिस टेक्निशियन’ ची पदे अस्तित्वात आहेत.
यामुळेच Tata Institute of Social Sciences (TISS), महाराष्ट्र पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आणि SNDT Women’s University यांसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये ‘हेमोडायालिसिस टेक्निशियनसाठी’ डिप्लोमा व पदवी अभ्यासक्रम उपलब्ध केले गेलेले आहेत.
भारतात किडनी आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांच्या योग्य उपचारासाठी प्रशिक्षित व विशेष तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आजही सर्व रुग्णांना मोफत डायालिसिस सेवा उपलब्ध होत नाही. केवळ शासकीय व महानगरपालिका रुग्णालयांमध्येच मोफत किंवा परवडणाऱ्या दरात ‘डायालिसिस’ सुविधा उपलब्ध आहेत, तर खासगी रुग्णालये व डायालिसिस केंद्रांमध्ये डायालिसिसचे दर अत्यंत महाग असल्यामुळे अनेक रुग्णांना उपचार परवडत नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांना परवडणारी व दर्जेदार ‘डायालिसिस’ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रशिक्षित मनुष्यबळासह ‘हेमोडायालिसिस टेक्निशियन’ ची कायमस्वरूपी पदे निर्माण करावी अशी मागणी ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’ च्या वतीने करण्यात आली आहे.
पालिकेच्या नायर, केईएम,सायन व कुपर रुग्णालयांमध्ये ‘हेमोडायालिसिस टेक्निशियन’ची कायमस्वरूपी पदे निर्माण करण्यात यावीत अशी आग्रही मागणी केल्याचे डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी म्हटले आहे.
संकलन:- श्री राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक तथा डायरेक्टर
