बोथली येथे परमात्मा एक सभामंडप बांधकामाचे लोकार्पण सोहळा संपन्न
मानव धर्मातील परमात्मा एक सेवक बांधवांना चर्चा बैठकी करीता त्यांना हक्काचे सभामंडप व्हावे हाच माझा उद्देश – आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे
आमदार मा.श्री.राजू माणिकरावजी कारेमोरे यांच्या प्रयत्नातून बोथली येथे 15 लक्ष रु. निधि मंजूर करुन परमात्मा एक सेवक बांधवांन करीता सभामंडप बांधकाम करण्यात आले. असून मानव मंदिराचे लोकार्पण सोहळा आज दिनांक 27 सप्टेम्बर 2025 रोज शनिवार ला आयोजित करण्यात आले. असून कार्यक्रमाचे उद्घाटक :- मा.श्री.आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले असून प्रमुख पाहुणे:- मा.श्री.नरेश ईश्वरकर शिक्षण व बांधकाम सभापती जि.प.भंडारा तसेच उपसभापती देवा चकोले, बोथलीचे उपसरपंच संदीप पिंगळे, माजी सरपंच कैलास तितीरमारे, ग्रामपंचायत सदस्य विकेश बाभरे, अलका वैद्य, पल्लवी बाभरे, सतीश वैद्य,चंद्रभान तितीरमारे तसेच समस्त सेवक सेविका उपस्थित होते.त्यावेळी सर्व सेवक सेविका बाल गोपाल यांनी आमदार राजू कारेमोरे यांचे आभार मानले.

