BREAKING NEWS:
गोंदिया महाराष्ट्र शिक्षण हेडलाइन

सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाची अपूर्वा बिसेन गोंदिया जिल्ह्यातून प्रथम

Summary

अर्जुनी मोर.:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ नागपूरच्या वतीने घेण्यात आलेले बारावीच्या परीक्षेत अर्जुनी मोरगावच्या सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी अपूर्वा टोपेशकुमार बिसेन ही 96.13(578) टक्के गुण घेऊन विज्ञान शाखेत जिल्ह्यात प्रथम आलेली आहे. तसेच ऋषभ गजानन […]

अर्जुनी मोर.:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ नागपूरच्या वतीने घेण्यात आलेले बारावीच्या परीक्षेत अर्जुनी मोरगावच्या सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी अपूर्वा टोपेशकुमार बिसेन ही 96.13(578) टक्के गुण घेऊन विज्ञान शाखेत जिल्ह्यात प्रथम आलेली आहे. तसेच ऋषभ गजानन गभणे 96.17(577), सुमित तुलाराम हेमने 95.67(574) जिल्ह्यातून द्वितीय व तृतीय आलेले आहेत.यश भुवनेश्वर शहारे 92.50(555), क्रिश गणेश दृगकर 92.50(555), कृणाल शहाजी बोरकर91.33(548) गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहे. सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा दरवर्षीप्रमाणे कायम ठेवलेली आहे.
विद्यालयाच्या विज्ञान व कला शाखेच्या निकाल 100% लागला असून कुमारी रांची भीमराव लांडगे ही विद्यार्थिनी 92.17(553) गुण घेऊन जिल्ह्यात द्वितीय आलेली आहे.
सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतून एकूण 148 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यापैकी 44 विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत व 86 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 18 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 100 टक्के आहे तर कला शाखेतून एकूण 59 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 9 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत 19 विद्यार्थी प्रथम श्रेणी 31 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले कला शाखेची सुद्धा निकालाची टक्केवारी 100 आहे. कला शाखेतून कुमारी स्नेहल सेवकराम उपवंशी 87.67(526), कुमारी सोनाली रामाजी करपते87.17(523), कुमारी
पायल युवराज शिंगाडे 82.83(494), हर्षद उद्धव वाढवे80.00(480) गुण प्राप्त केले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष बल्लभदासजी भुतडा,संस्था सचिव सर्वेश भुतडा, कोषाध्यक्ष जयप्रकाश भैया,प्राचार्य जे .डी. पठाण, उपप्राचार्य एम.के. पालीवाल, पर्यवेक्षक एल.एल. खोब्रागडे, प्राध्यापकवर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *