सुरजागड सह गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण 25 लोहखदानी रद्द करा या मागणीसाठी शेकापचे विधान भवनासमोर आंदोलन.
सुरजागड सह गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण 25 लोहखदानी रद्द करा या मागणीसाठी शेकापचे विधान भवनासमोर आंदोलन.
मुबंई पोलिसांनी विधानभवन परिसरातून शेकापचे भाई रामदास जराते यांना केली अटक
गडचिरोली-/ चक्रधर मेश्राम दि.7 मारली 2022-
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात बळजबरी पोलीस बळाचा वापर करून विकासाच्या नावावर जंगलाची अवैध वृक्षतोड करून लोहखदान सुरू करण्यात आलेली आहे. कोरची तालुक्यातील झेंडपार सह विविध ठिकाणी लोहखाणी प्रस्तावित करण्यात आलेल्या असून ग्रामसभांना मिळालेले संविधानिक हक्क व अधिकारावर गदा आणले असून सरकार लाखो एकर जमिनीवरील जंगल अवैधरीत्या नष्ट करीत आहे.आपल्या
प्रथा परंपरा रीतिरिवाज आणि जगण्याची संसाधने व अस्तित्व टिकविण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील माडिया समाज संघर्ष करीत आहे.मात्र भांडवल दाराच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकार या संघर्षाकडे दुर्लक्ष करीत असल्याने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते,भाई देवेंद्र चिमनकर,यांच्या नेतृत्वात आज 7 मार्च ला विधान भवनाच्या दारावर लक्षवेधी निदर्शने करण्यात आली. या निर्दशना दरम्यान मुबंई पोलिसांनी आंदोलन कर्त्या चे नेतृत्व करणारे शेतकरी कामगार पक्षाचे भाई रामदास जराते, देवेंद्र चिमनकर व इतर आंदोलन कर्त्याना अटक केली.
संविधानाची पाचवी अनुसूची पेसा व वनाधिकार कायद्याने जल जंगल व जमीन व संसाधनाची मालकी ग्रामसभेला प्राप्त करून दिली असताना व जंगलावर आधारीत आर्थिक विकासाच्या संधी निर्माण झालेल्या असताना भांडवल दाराच्या हितासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड, बांडे,गुंडजूर, मोहंदि,दम कोंडवाही आगरी, मसेली,झेंडपार या 25 लोहखाणी प्रस्तावित आहे.यामध्ये 45 हजार एकर जंगलाची तोड होणार आहे यामुळे पिढ्यानपिढ्या जंगलावर उपजीविका करणाऱ्या आदिवासी बांधवावर सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्ट्या विस्थापित होण्याची वेळ आली आहे.यामुळे जंगलातील अती असुरक्षित जमातींपैकी एक असलेल्या माडिया जमातीचे मानवी अस्तित्व संपण्याचा धोका निर्माण झाला आहे.