सिनेमाच्या पडद्यावर नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यात जनतेसाठी लढणाऱ्या ‘रियल लाईफ हिरो’चा सन्मान! समाजसेवक अरविंद कुमार रतूड़ी उर्फ ‘सनी भाऊ हिंदुस्तानी’ यांना ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान!
नागपूर (विशेष प्रतिनिधी):
आजच्या काळात जिथे माणूस पैसा, प्रतिष्ठा आणि स्वतःच्याच कुटुंबापुरता मर्यादित झाला आहे, तिथे संपूर्ण देशाला आणि अगदी मुक्या प्राण्यांनाही आपलं कुटुंब मानणारा एक ‘रियल लाईफ नायक’ नागपुरात गेल्या ३० वर्षांपासून अहोरात्र झटतोय. कुठलाही स्वार्थ नाही, कुठलंही मानधन नाही… फक्त आणि फक्त देशसेवा आणि जनसेवेचा ध्यास! अशाच या निधड्या छातीच्या सुप्रसिद्ध युवा रामसेवक आणि समाजसेवक अरविंद कुमार रतूड़ी उर्फ ‘सनी भाऊ हिंदुस्तानी’ यांच्या कार्याला अखेर राष्ट्रीय स्तरावर सलाम करण्यात आला आहे.
१५ ऑक्टोबर २०२६ रोजी नागपूरच्या ऐतिहासिक रवी भवन (आमदार निवास) येथे पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात रतूड़ी यांना ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. ग्लोबल एकता मीडिया न्यूज, गिफ्ट न्यूज अँड मीडिया न्यूज, एकता फाउंडेशन सामाजिक संघटना आणि ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टीम (नागपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला. मुख्य संपादक डॉ. जय संजय रामटेके आणि डॉ. मनीषा ठाकरे यांच्या हस्ते जेव्हा सनी भाऊंना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले, तेव्हा सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
तीस वर्षांचा अखंड संघर्ष आणि ४५ संघटनांचे नेतृत्व!
सनी भाऊंची ओळख केवळ एक समाजसेवक म्हणून नाही, तर अन्यायाविरुद्ध लढणारा आणि संकटात धावून जाणारा एक ‘वन मॅन आर्मी’ अशी आहे.
- संस्थापक अध्यक्ष: ‘किंग कोब्रा ऑर्गनायझेशन युथ फोर्स’, ‘राष्ट्र निर्माण की ओर दो कदम’, ‘नारी शक्ती एक सन्मान’, ‘पशू क्रूरता के खिलाफ जंग’ आणि ‘राष्ट्रीय धर्म सर्वोपरि’ यांसारख्या धडाडीच्या संघटनांचे ते सर्वेसर्वा आहेत.
- प्रशासनाचा भक्कम कणा: राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल ४५ सामाजिक संघटनांचे प्रतिनिधित्व करतानाच, नागपूर महानगरपालिकेचे ‘आरोग्य, शिक्षण व स्वच्छता अभियान मित्र’, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कार्यकर्ते आणि महाराष्ट्र पोलीस केंद्रीय शांतता समितीचे केंद्रीय सदस्य म्हणून ते शासन-प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. सण-उत्सव असो वा नैसर्गिक आपत्ती, सनी भाऊ नेहमीच पहिल्या फळीत उभे असतात.
पुरस्कार स्वीकारताना सनी भाऊंचा काळजाला भिडणारा संवाद:
पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना सनी भाऊ म्हणाले, “सत्य, अहिंसा आणि सेवा हाच खरा राष्ट्रीय आणि मानवता धर्म आहे. आपण कोणत्याही जात, धर्म, पंथ, रंग किंवा भाषेत न विभागता, केवळ ‘एक भारतीय’ म्हणून महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील सशक्त भारत घडवायचा आहे.”
क्लायमॅक्स: शौर्याला आणि वीर माता-पित्याला पुरस्कार समर्पित!
या सोहळ्याचा सर्वात भावनिक क्षण तेव्हा आला, जेव्हा रतूड़ी यांनी हा पुरस्कार स्वतःकडे न ठेवता देशाच्या खऱ्या शूरवीरांना समर्पित केला. १९६२ च्या युद्धातील नायक-नायिका असलेले त्यांचे दिवंगत सैनिक माता (एसएसबी शस्त्र प्रशिक्षिका) व पिता (पीएलडी ब्लॉक कमांडर) आणि तब्बल १८० लोकांचा जीव वाचवून जगभरात भारताची मान अभिमानाने उंचावणारे भारतवंशी कॅप्टन पायलट श्री. स्मित मच्छार यांच्या अदम्य शौर्याला त्यांनी हा सन्मान समर्पित करून उपस्थितांची मने जिंकली.
