नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला
नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला
संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….
चंद्रपूर – 4 मार्च सकाळी 9 वाजेदरम्यान कांग्रेस नगरसेवकावर प्राणघातक हल्ल्या झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मॉर्निंग वॉक नंतर नंदू नागरकर हे घरी जाण्यासाठी निघाले असता रघुवंशी कोम्पलेकस समोरील सार्वजनिक शौचालय जवळ एका युवकाने नागरकर यांना गाडी आपल्या बाजूने चालव असे म्हटल्यावर दोघात वाद झाला.
काही वेळातच पुन्हा 3 युवक त्या ठिकाणी पोहचत नागरकर यांच्या गाडीसमोर आडवे झाले, फिल्मी स्टाईलने युवकांनी हातात असलेले दांडे व बॅट ने नागरकर यांना मारायला लागले.
नागरकर यांच्या पायाला, पाठीला व डोक्याला बॅट ने वार करण्याचा प्रयत्न केला मात्र नागरकर यांनी हाताने तो वार अडविण्याचा प्रयत्न केला.
मारहाण करणारे सर्व युवक चेहऱ्यावर कापड बांधून असल्याने त्यांचा चेहरा नागरकर यांना बघता आला नाही.
नागरकर यांना मारहाण केल्यावर युवक दुचाकीने पळून गेले, काही वेळ तिथेच पडून असल्याने नागरिकांनी नागरकर यांना उचलत रुग्णालयात दाखल केले.
या हल्ल्यांचे दिवसभरात चांगलेच पडसाद बघायला मिळाले, शहर कांग्रेस, महिला कांग्रेस, यंग चांदा ब्रिगेड व चंद्रपूर मनपा सदस्यांनी घटनेचा निषेध करीत आरोपींना तात्काळ अटक व्हायला पाहिजे अशी मागणी केली.
खुद्द पालकमंत्री यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहे.