सिल्लोड

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने सत्कार

Summary

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि. 26, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील सिल्लोड – कन्नड दौऱ्यावर असतांना त्यांनी शनिवार रोजी सिल्लोड नगर परिषदेस सदिच्छा भेट दिली. यावेळी नगर परिषदेच्या वतीने ना. जयंत पाटील यांचा सन्मानचिन्ह, शाल , पुष्पहार देऊन सत्कार करण्यात […]

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि. 26, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील सिल्लोड – कन्नड दौऱ्यावर असतांना त्यांनी शनिवार रोजी सिल्लोड नगर परिषदेस सदिच्छा भेट दिली. यावेळी नगर परिषदेच्या वतीने ना. जयंत पाटील यांचा सन्मानचिन्ह, शाल , पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. तर मंत्री जयंत पाटील यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पा. चिकटगावकर, राष्ट्रवादी आरोग्य सेलचे डॉ. काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी नगर परिषदेच्या वतीने युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती अर्जुन पा. गाढे यांनी तर व्यापारी महासंघाच्या वतीने नॅशनल सुत गिरणीचे उपाध्यक्ष नरेंद्र ( बापू ) पाटील यांनी ना. जयंत पाटील यांचा सत्कार केला. नगर परिषद कार्यालयातील सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नगर परिषदेच्या विकास कामा सोबत मतदार संघाच्या भौगोलिक क्षेत्राची माहिती मंत्री जयंत पाटील यांना दिली.यावेळी मतदार संघातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात देखील चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख दुर्गाबाई पवार,डॉ. संजय जामकर, पंचायत समितीचे उपसभापती काकासाहेब राकडे, नगर परिषद गटनेते तथा बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक सतीश ताठे, मारुती वराडे, निजाम पठाण, सयाजी वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्ता पांढरे, शेख शाकेर , अजित पाटील, युवासेनेचे कैलास जाधव, धैर्यशिल तायडे, अक्षय मगर, शिवा टोम्पे, इम्रान शेख ( गुड्डू ) , गौरव सहारे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ,शकुंतलाबाई बन्सोड, कल्याणीताई गौर, रुउफ बागवान, शंकरराव खांडवे, आसिफ बागवान, जुम्मा खा पठाण, चांदबेग मिर्झा, राजू गौर, मतीन देशमुख यांच्यासह हनिफ मुलतानी, विजय खाजेकर, रामसेट कटारिया, समाधान गोंगे , सुनील लांडगे, नाना कळम, प्रकाश वराडे, आशिष कटारिया, संतोष धाडगे, रवी रासने, आशिष कुलकर्णी आदींसह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *