BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आचार्य विनोबा भावे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Summary

मुंबई, दि. ११:- सर्वोदयी विचारांचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले आहे. मुख्यमंत्री म्हणतात, आचार्य विनोबा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींची विचारधारा स्वीकारणारे प्रथम सत्याग्रही होते. त्यांनी भूदान चळवळीतून सामाजिक क्रांती केली. प्रबोधनातून मिळविलेली जमीन […]

मुंबई, दि. ११:- सर्वोदयी विचारांचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले आहे.

मुख्यमंत्री म्हणतात, आचार्य विनोबा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींची विचारधारा स्वीकारणारे प्रथम सत्याग्रही होते. त्यांनी भूदान चळवळीतून सामाजिक क्रांती केली. प्रबोधनातून मिळविलेली जमीन त्यांनी भूमिहीन शेतमजुरांना वाटप केली. तत्त्वचिंतक, व्रतस्थ अशा या भारतमातेच्या महान सुपुत्राला, आचार्य विनोबा भावे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *