नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

जिवंतपणी त्वचा दान करा आणि मृत्यू दर घटवा – डॉ. गिरीश त्रिवेदी ईनर व्हिल क्लब आणि रोटरी क्लब यांचा संयुक्त उपक्रम ‘जिवंत जग आणि मेलेला मानव’

Summary

नागपूर – – स्थानिक रोटरी क्लब नागपूर ग्रीन सिटी, फोर्ट, मिहान टाऊन, एलिट तसेच ईनर व्हिल क्लब नागपूर, ईस्ट, आँरेंज सिटी यांचे संयुक्त विद्यमाने एक आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला. यासाठी डॉ. गिरीश त्रिवेदी, रोटरी क्लब ऑफ मुंबई, कांदिवली यांचे मोठे […]

नागपूर – – स्थानिक रोटरी क्लब नागपूर ग्रीन सिटी, फोर्ट, मिहान टाऊन, एलिट तसेच ईनर व्हिल क्लब नागपूर, ईस्ट, आँरेंज सिटी यांचे संयुक्त विद्यमाने एक आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला. यासाठी डॉ. गिरीश त्रिवेदी, रोटरी क्लब ऑफ मुंबई, कांदिवली यांचे मोठे योगदान लाभले. जिवंतपणी त्वचा दान करणे आणि मृत्यू पश्चात त्वचा दान करणे यावर आंतरजातीय पटलाद्वारे माहिती दिली.
1,40,000 लोक दरवर्षी जळाल्याने मृत्यू पावतात जे 50 ते 60 टक्के च्या वर जळलेले असतात म्हणून त्वचा दान करणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे मृत्यू दर सुध्दा कमी होइल याची जनजागृती करणे आज काळाची गरज आहे. एकटय़ा मुंबई शहरात 2000 लोकांना skin grafting साठी तवचेची गरज असते पण skin bank मध्ये फक्त 10 लोकांनी त्वचा दान केलेली असते. त्याचप्रमाणे रक्तदान, Platlates (रक्तपट्टीका) या सुद्धा दान करता येतात. त्यासाठी व्यक्तीच्या शरीरातून रक्त काढून त्यातून Platlates काढून घेतात आणि नंतर रक्त वापस व्यक्तीच्या शरीरात सोडले जाते. Platlates Donation हे Tata Hospital, मुंबई येथे Electrophoresis Machine द्वारा केले जाते. पिलीया, काविळ सारखे अनेक आजार असे आहेत की व्यक्तीच्या शरीरातील Platlates पटापट कमी करतात आणि व्यक्ती मृत्यू पावतात. अशावेळेस Blood Bank मधून Platlates देतात जर लोकांनी Platlates दान केले नाही तर रुग्णास Platlates तुटवडयामूळे मृत्यू येईल. म्हणून ही काळाची गरज असल्याचे डॉ. गिरीश यांनी सांगितले.
व्यक्तीला दोन Kidneys असतात. आपल्या परिवारातील व्यक्तीला एक Kidney दिल्यास एका Kidney वर आरामात आयुष्य जगू शकतो. असा सल्ला त्यांनी दिला. तसेच आपल्याच परिवारातील कोणाचे लिव्हर खराब झाले असेल तर आपल्या लिव्हर चा काही हिस्सा दान करता येतो.
त्वचा दान करताना व्यक्तीच्या पायाची, मांडीची आणि पाठीचीच फक्त त्वचा काढली जाते. तेही फक्त त्वचेचा वरचा पातळ थर ज्यामुळे कोणतीही इजा होत नाही. रक्तस्राव होत नाही आणि लवकरच भरून निघते. 45 मिनीटात ही त्वचा काढल्यानंतर 35-40 दिवस Processing साठी ठेवली जाते नंतर जळलेल्या व्यक्तीला Skin Grafting साठी वापरली जाते. Skin Bank मध्ये दान केलेली त्वचा 5 वर्षे पर्यंत राहू शकते. जळण्याच्या जास्तीत जास्त घटना या किचन मध्ये होतात.
मृत्यू नंतर सुद्धा त्वचा दान करता येते, त्यासाठी परिवाराची परवानगी आवश्यक असते. कोणत्याही वयाच्या व्यक्ती त्वचा दान करु शकतात तसेच सुरकुतलेली त्वचा दान केल्यास Processing द्वारा तीला ताजीतवानी केली जाते. त्वचेचा रंग कोणताही असला तरी चालतो. मृत्यू नंतर 6 ते 8 तासापर्यंत त्वचा दान करता येते. त्यासाठी कोणताही आजार नाही हे दाखवणारा मृत्यू दाखला आवश्यक असते. लेझर मशीन द्वारा त्वचा काढल्यानंतर 50% Glycerol मध्ये साठवून Skin Bank मध्ये ठेवल्या जाते. त्यामुळे अंतिम संस्कार करतांना कोणताही त्रास होत नाही. अनेक लोकांना मृत्यू पासून वाचवण्यासाठी त्वचा दान आवश्यक आहे. तसेच अवयव दान, नेत्र दान सुद्धा करणे फारच महत्वाचे आहे. एक व्यक्ती अवयव दान करतो तेव्हा 12 व्यक्तींना जीवंत ठेवण्यासाठी फायदा होतो. अशाप्रकारे अत्यंत उपयुक्त माहिती डॉ. गिरीश त्रिवेदी यांनी दिली.
हा कार्यक्रम ईनर व्हिल क्लब नागपूर आँरेंज सिटी च्या प्रेसिडेंट आणि प्रोजेक्ट चेअर पर्सन रोटरीयन पदमा देठे तसेच रोटरी क्लब ऑफ नागपूर ग्रीन सिटी च्या प्रेसिडेंट रोटरीयन डॉ. शारदा रोशनखेडे यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाला डॉ. रवी सहगल, रोटरी क्लब ऑफ दिल्ली शहादरा, असिस्टंट गव्हर्नर रोटरीयन मंजूषा चकनलवार, प्रेसिडेंट रोटरीयन हिमांशू ठाकर, प्रेसिडेंट रोटरीयन शुभंकर पाटील, प्रेसिडेंट डॉ. उज्वला मोहता यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. प्रेसिडेंट रोटरीयन वैशाली बारई यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज चॅनल
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *