BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

म्युनिसिपस कर्मचारी कामगार सेना मुंबईकारांना होणार्या त्रासाला पालिका प्रशासन जबाबदार !

Summary

     मुंबई महापालिकेतील सफाई व परिवहन खात्याच्या तसेच रुग्णालयांच्या खाजगीकरणाविरोधात दि. ११ जून रोजी शिवाजी मंदिर, दादर येथे मेळावा पार पडला. त्यानंतर दि.१७ जून रोजी आझाद मैदान येथील एल्गार मोर्चा मध्ये पालिका कर्मचाऱ्यांनी आपली प्रचंड एकजूट दाखवून, खाजगीकरणाच्या विरोधात […]

     मुंबई महापालिकेतील सफाई व परिवहन खात्याच्या तसेच रुग्णालयांच्या खाजगीकरणाविरोधात दि. ११ जून रोजी शिवाजी मंदिर, दादर येथे मेळावा पार पडला. त्यानंतर दि.१७ जून रोजी आझाद मैदान येथील एल्गार मोर्चा मध्ये पालिका कर्मचाऱ्यांनी आपली प्रचंड एकजूट दाखवून, खाजगीकरणाच्या विरोधात रोष व्यक्त केला. पालिका आयुक्तांना भेटून दिलेल्या निवेदनाअनुषंगाने प्रशासनाने, कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. त्यामुळे मोर्चामध्ये घेतलेल्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी परिमंडळ स्तरीय निदर्शने आयोजित केली गेली आहेत. दि. २३ जून ते ३० जून दरम्यान होणार्या निदर्शनामध्ये कामगार संघटना संघर्ष समितीचे सर्वच प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. परिमंडळ- १, उपायुक्त कार्यालय,भायखळा, परिमंडळ -२, उपायुक्त कार्यालय, परेल, परिमंडळ -३, उपायुक्त कार्यालय , अंधेरी(पुर्व), परिमंडळ -४, उपायुक्त कार्यालय, अंधेरी(पश्चिम), परिमंडळ -५, उपायुक्त कार्यालय, चेंबुर,परिमंडळ -६, उपायुक्त कार्यालय, घाटकोपर,परिमंडळ -७, उपायुक्त कार्यालय, बोरीवली. येथे सकाळी ११.०० वा. निदर्शने पार पडतील.
दरम्यान प्रशासनाने, खासगीकरणाच्या निविदा मागे घेतल्या नाहीत, तर १ जुलै पासुन पालिका कामगार बेमुदत संपावर जातील. ऐन पावसाळयात लादल्या गेलेल्या संपामुळे मुंबईकर जनतेला होणार्या त्रासाला पालिका प्रशासन जबाबदार राहील – डॉ. संजय कांबळे-बापेरकर (उपाध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *